'कहानी २' चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

'कहानी २' चित्रपटाच्या फर्स्ट लूकनंतर  आता त्याचा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे..

Updated: Oct 24, 2016, 11:36 PM IST

मुंबई : 'कहानी २' चित्रपटाच्या फर्स्ट लूकनंतर  आता त्याचा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. ‘मी कोणाचे अपहरण किंवा हत्या केली नाही,’ असे विद्या टीझरमध्ये बोलताना दिसते. ‘कहानी’च्या पहिल्या भागाप्रमाणे दुसऱ्या भागाचे दिग्दर्शनही सुजॉय घोषच करणार आहे. 

‘कहानी २’ची झलक ही थक्क करणारी असल्यामुळे तिच्या पहिल्या ‘कहाणी’प्रमाणेच दुसऱ्या कहाणीत नक्की काय रहस्य लपलं आहे याची प्रेक्षकांना उत्सुकता लागली आहे.