पुस्तक प्रकाशन सोहळ्यात कसुरींचा मोदीना टोला

 शिवसेनेच्या विरोधानंतरही सोमवारी मुंबईच्या नेहरू सेंटरमध्ये पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री खुर्शीद मेहमूद कसुरू यांच्या पुस्तक प्रकाशनाचा सोहळा पार पडला. कार्यक्रमात कसूरीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनना पाकिस्तान सोबत संबंध सुधारण्यासाठी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या मार्गावर चालण्याचा सल्ला दिला. 

Updated: Oct 12, 2015, 10:01 PM IST
पुस्तक प्रकाशन सोहळ्यात कसुरींचा मोदीना टोला title=

मुंबई :  शिवसेनेच्या विरोधानंतरही सोमवारी मुंबईच्या नेहरू सेंटरमध्ये पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री खुर्शीद मेहमूद कसुरू यांच्या पुस्तक प्रकाशनाचा सोहळा पार पडला. कार्यक्रमात कसूरीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनना पाकिस्तान सोबत संबंध सुधारण्यासाठी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या मार्गावर चालण्याचा सल्ला दिला. 

पंतप्रधान मोदी यांनी विकासाचे आश्वासन दिले आहे. पण आम्हांला शांती हवी आहे. मी आशा करतो पंतप्रधानांना जाणीव आहे का अटल बिहारी वाजपेयी यांचा मार्ग योग्य होता. 

या कार्यक्रमाला बॉलिवूड अभिनेत नसीरुद्दीन शाह, वरिष्ठ पत्रकार दिलीप पाडगावकर हे देखील उपस्थित होते. सार्क देशांच्या शांतीच्या प्रार्थनेने कार्यक्रमाची सुरूवात जाली. या दरम्यान, सुधींद्र कुलकर्णी म्हणाले, काही दिवसांपूर्वी भारताचे राष्ट्रपती यांनी म्हटले होते की, सहनशीलता आणि विविधता हे भारताचे मूल्य आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून मूल्यांचे रक्षण करीत आहोत. 

दरम्यान, या कार्यक्रमापूर्वी शिवसेनेने सकाळी कसुरी  आणि सुधींद्र कुलकर्णी यांचा विरोध करण्यासाठी त्यांच्या अंगावर काळी शाई फेकली होती. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.