व्यापाऱ्यांचा बंद, मुंबईत काळा बाजार सुरू...

एलबीटीविरोधात व्यापाऱ्यांच्या बंदचे परिणाम आता मुंबईत दिसू लागले आहेत. मुंबईत जीवनावश्यक वस्तूंचा काळाबाजार सुरु झाला आहे.

Updated: May 9, 2013, 10:41 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
एलबीटीविरोधात व्यापाऱ्यांच्या बंदचे परिणाम आता मुंबईत दिसू लागले आहेत. मुंबईत जीवनावश्यक वस्तूंचा काळाबाजार सुरु झाला आहे.
जीवनावश्यक वस्तूंची चढ्या भावानं विक्री होऊ लागली आहे. काही व्यापाऱ्यांनी बंदचा फायदा उठवायला सुरुवात केली आहे. काळा बाजार तेजीत असल्याने गरजेच्या वस्तूंची विक्री सुरु केली आहे. तसेच या वस्तूं चढ्य़ा भावानं विकल्या जात आहे.
नाईलाजाने या वस्तू सर्वसामान्यांना विकत घ्याव्या लागत आहे. एकीकडे व्यापाऱ्यांचे संपाने सामान्य नागरिक हैराण झाले आहेत. तर दुसरीकडे व्यापारीच काळाबाजार करीत असल्याने सामान्य मात्र चांगलेच कात्रीत सापडले आहेत. संपात सर्वसामान्यांचे हाल होणार नाहीत असा व्यापाऱ्यांनी दावा केला होता.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.