माधुरी दीक्षितला पितृशोक

अभिनेत्री माधुरी दीक्षित - नेने हिचे वडील शंकर दीक्षित(वय ९१) यांचे शुक्रवारी सकाळी निधन झाले. त्यावेळी त्यांचे कुटुंबिय त्यांच्यासोबत होते. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते.

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Sep 13, 2013, 10:49 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
अभिनेत्री माधुरी दीक्षित - नेने हिचे वडील शंकर दीक्षित(वय ९१) यांचे शुक्रवारी सकाळी निधन झाले. त्यावेळी त्यांचे कुटुंबिय त्यांच्यासोबत होते. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते.
माधुरी सध्या एका डान्स रिअॅयलिटी शोमध्ये परिक्षक म्हणून काम पाहत आहे. त्याच्या अंतिम फेरीमध्ये ती परफॉर्म करणार होती. गुरूवारी तिच्या वडिलांची तब्येत खालावल्याने तिच्याऐवजी प्रियांका चोप्रा परफॉर्म करणार होती.
पण गुरूवारी माधुरीने या कार्यक्रमासाठी शूटिंग केले. मात्र आज सकाळी तिच्या वडिलांचे निधन झाल्याने आजचे शूट स्थगित करण्यात आले आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.