नोटा बदलायला आलेल्या वृद्धाचा रांगेतच मृत्यू

मुलुंडच्या हरिओम नगरमध्ये स्टेट बँकेत नोटा बदलण्यासाठी आलेल्या ज्येष्ठ नागरिकाचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाला आहे.

Updated: Nov 11, 2016, 04:00 PM IST
नोटा बदलायला आलेल्या वृद्धाचा रांगेतच मृत्यू title=

मुंबई : मुलुंडच्या हरिओम नगरमध्ये स्टेट बँकेत नोटा बदलण्यासाठी आलेल्या ज्येष्ठ नागरिकाचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाला आहे. विश्वास वर्तक असं मृत नागरिकाचं नाव असून ते बँकेबाहेर रांगेत उभे असताना त्यांना चक्कर आली.

चक्कर आल्यावर वर्तक खाली कोसळले. त्यांना दवाखान्यात नेलं असता डॉक्टरांनी त्यांचा मृत्यू झाल्याचं घोषित केलं आहे. या घटनेनंतर वर्तक कुटुंबियांनी बँक प्रशासन किंवा सरकारविरोधात कोणतीही तक्रार केलेली नाही.