धक्कादायक : गाडी धुण्यासाठी वापरणारा प्रेशर पंप गुदद्वारात टाकल्याने मृ्त्यू

 दोन मित्रांची चेष्टा एखाद्याचा जीव घेऊ शकते, असा प्रकार मुंबईतील काळा चौकी भागात घटला. हवेच्या प्रचंड दाबामुळे एकाला मित्राला आपला जीव गमवावा लागला आहे, तर दुसरा तुरूंगात गेला आहे. 

Updated: Sep 30, 2015, 02:13 PM IST
धक्कादायक : गाडी धुण्यासाठी वापरणारा प्रेशर पंप गुदद्वारात टाकल्याने मृ्त्यू title=

मुंबई :  दोन मित्रांची चेष्टा एखाद्याचा जीव घेऊ शकते, असा प्रकार मुंबईतील काळा चौकी भागात घटला. हवेच्या प्रचंड दाबामुळे एकाला मित्राला आपला जीव गमवावा लागला आहे, तर दुसरा तुरूंगात गेला आहे. 

अधिक वाचा : बीफ खाल्ल्याच्या अफवेनंतर जमावानं मारहाण करत केलं ठार

काळाचौकी भागातील टोयोटा सर्व्हिस सेंटरमध्ये ही घटना घटली. याकूब शेख या ४८ वर्षीय व्यक्तीचे यात प्राण गेले. वाहनांची सफाई करताना हा प्रकार घडला. याकूब शेख वाहनांची सफाई करत होते. वाहनांशी सफाई करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या प्रेशर पंपामुळे या व्यक्तीचा मृत्यू झाला.  या प्रकरणी मित्र संतोष याच्या विरोधात मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

असा प्रकार घडला

याकूब आणि संतोष हे नेहमी प्रमाणे मंगळवारी दुपारी अडीच्या सुमारास एअर प्रेशर पंपाने गाड्यांची सफाई करत होते. यावेळी संतोषने हवेचा दाब किती आहे हे जाणण्यासाठी याकूबला एअर प्रेशन गुदद्वारात टाकण्याचे चॅलेंज दिले. संतोषचे हे चॅलेंज याकूबने स्वीकारले. 

अधिक वाचा : क्रूर बापानं आईसमोरचं चिमुरडीला जमिनीवर आपटून ठार केलं!

याकूबने गुदद्वारात पंप घातल्यानंतर संतोषने मशीन सुरू केली आणि मोठ्या दाबाने शरीरात हवा गेली. याकूब जागीच बेशुद्ध पडला त्याला उपचारासाठी केईएममध्ये नेण्यात आले पण दाखल करण्यापूर्वी त्याचा मृत्यू झाला होता. 

हवा शरीरात गेल्याने फुग्यासारखा फुगला याकूब 

याकूबची अवस्था पाहून केईएम हॉस्पिटलचे डॉक्टरांनी काही सूचत नव्हतं. हवेच्या प्रचंड दाबामुळे याकूबचे शरीर सामान्यपेक्षा दुप्पटीने फुगले होते. त्याचे शरीर एखाद्या सुमो पहेलवानासारखे दिसत होते, असे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले. 

श्वास घेण्याची प्रक्रिया बंद पडल्याने याकूबचा मृत्यू झाला. शरिरात हवा घुसल्याने धमण्या आणि फुफ्फुसात हवा भरली आणि श्वसन यंत्रणा बंद पडल्याचे पोस्टमार्टम करणाऱ्या डॉक्टरांनी एका वर्तमानपत्राला सांगितले. १५ वर्षापेक्षा अधिक काळ पोस्टमार्टम करत आहे पण अशी केस पहिल्यांदा पाहिल्याचे या डॉक्टरांनी सांगितले. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.