मावळ गोळीबारप्रकरण : हायकोर्टने राज्य सरकारला फटकारले

मावळ गोळीबारप्रकरणी गायकवाड समितीनं जबाबदार ठरवलेल्या पोलीस अधिका-यांवर कोणतीही कारवाई न केल्यामुळं हायकोर्टानं राज्य सरकारला फटकारले आहे. तसंच या प्रकरणात दोषी धरण्यात आलेल्या अधिका-यांवर कारवाई करण्याचे आदेशही कोर्टानं दिले आहेत.

Updated: Nov 1, 2014, 10:05 PM IST
मावळ गोळीबारप्रकरण : हायकोर्टने राज्य सरकारला फटकारले title=

मुंबई : मावळ गोळीबारप्रकरणी गायकवाड समितीनं जबाबदार ठरवलेल्या पोलीस अधिका-यांवर कोणतीही कारवाई न केल्यामुळं हायकोर्टानं राज्य सरकारला फटकारले आहे. तसंच या प्रकरणात दोषी धरण्यात आलेल्या अधिका-यांवर कारवाई करण्याचे आदेशही कोर्टानं दिले आहेत.

मावळ प्रकरणाच्या चौकशीच्या मागणीसाठी ईश्वरप्रसाद खंडेलवाल यांनी केलेल्या जनहित याचिकेवरील सुनावणीदरम्यान दोन न्यायाधिशांच्या खंडपीठाने हे आदेश दिले. गायकवाड समितीच्या शिफारशी मान्य करूनही सरकारने काहीच कारावाई केली नसल्याची बाब खंडेलवाल यांनी कोर्टाच्या निदर्शनास आणून दिली.

जबाबदार ठरवलेल्या अधिका-यांना अद्याप कारणे दाखवा नोटीस का बजावली नाही असा सवालही कोर्टानं केलाय. या प्रकरणी तत्कालीन पोलीस अधीक्षक संदीप कर्णिक यांच्यासह अनेक पोलीस अधिका-यांना दोषी धरण्यात आलंय. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.