'त्या' मुलींचं नाव 'शिवसेना'

कल्पता मांडून शिवसेनेला युट्युबवर प्रमोट करण्याचा प्रयत्न एका युवकाने केलाय. हातगाडी ओढणारे आजोबा विचारतात, मुलीनो तुमचं नाव काय, त्यावर त्या दोघी सांगतात, आमचं नाव शिवसेना.

Updated: Sep 20, 2014, 10:04 PM IST
'त्या' मुलींचं नाव 'शिवसेना' title=

मुंबई : कल्पता मांडून शिवसेनेला युट्युबवर प्रमोट करण्याचा प्रयत्न एका युवकाने केलाय. हातगाडी ओढणारे आजोबा विचारतात, मुलीनो तुमचं नाव काय, त्यावर त्या दोघी सांगतात, आमचं नाव शिवसेना.

वयोवृद्ध हमाल हातगाडीवरून माल वाहून नेताना थकतो. हातगाडी ओढताना थापा लागतात. हातगाडी एका दगडाला अडकते. दगडावरुन चाक पुढे जात नाही. दम घेण्यासाठी वृद्ध हमाल थांबतो. त्याचवेळी दोन सुंदर तरुणी त्याच वाटेने चाललेल्या असतात. वृद्धाला मदतीची गरज असते. ही गरज ओळखून त्या दोघी पुढे येतात. हातातील पिशवी गाडीवर ठेवत हातगाडी ढकलण्यास मदत करतात. चढावातून गाडीवर काढल्यानंतर त्या निघून जातात. त्याचवेळी वृद्ध विचारतो मुलीनों तुमचे नाव काय? त्यावेळी या मुली सांगतात, आमचं नाव. आमचं नाव शिवसेना.

हा व्हिडिओ सोशल मीडियाच्या माध्यमातून आता ती व्हॉटस्अॅप, फेसबुक, टेलिग्राम, युट्युबच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचविण्याचे काम करण्यात येत आहे. 'माझं नाव शिवसेना' असे या मोहिमेचे नाव आहे. सोशल मीडियावरून शिवसेनेने या माध्यमातून प्रचारास सुरुवात केली आहे. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.