मनसेच्या पदाधिकाऱ्याला चाकूने भोसकले

नालासोपाऱ्यात मनसेच्या एका पदाधिकाऱ्यावर एका गुंडाने प्राणघातक हल्ला केला. त्याच्यावर चाकू हल्ला करण्यात आला.

Updated: May 28, 2016, 05:40 PM IST
मनसेच्या पदाधिकाऱ्याला चाकूने भोसकले title=

मुंबई : नालासोपाऱ्यात मनसेच्या एका पदाधिकाऱ्यावर एका गुंडाने प्राणघातक हल्ला केला. त्याच्यावर चाकू हल्ला करण्यात आला.

समीर गोलांबडे असं या मनसे पदाधिकाऱ्याचे नाव आहे. दुपारच्या सुमारास समीर कार्यालयात बसला असताना एका व्यक्तीनं चाकूनं त्याच्यावर वार केले. हल्ल्यानंतर तो तिथून पसार झाला.

जखमी समीरवर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याआधी बुधवारी रात्रीसुद्धा समीरवर असाच हल्ला झाला होता.