अंबानींची तिसरी पिढी मैदानात

अंबानींची तिसरी पिढी आता उद्योगाच्या मैदानात उतरत आहे. रिलायन्स उद्योगसमूहाच्या संचालक मंडळात मुकेश अंबानी यांचा मुलगा आकाश आणि मुलगी इशा अंबानी आजपासून सक्रीय झाले आहेत. 

Updated: Oct 12, 2014, 04:16 PM IST
अंबानींची तिसरी पिढी मैदानात title=

मुंबई : अंबानींची तिसरी पिढी आता उद्योगाच्या मैदानात उतरत आहे. रिलायन्स उद्योगसमूहाच्या संचालक मंडळात मुकेश अंबानी यांचा मुलगा आकाश आणि मुलगी इशा अंबानी आजपासून सक्रीय झाले आहेत. 

इशाला रिलायन्स जीओ इन्फोकॉम आणि आकाशला रिलायन्स रिटेलच्या संचालक मंडळात स्थान देण्यात आलं आहे. रिलायन्सनं एक परिपत्रक जारी करून यासंदर्भातली माहिती प्रसिद्ध केली आहे. याशिवाय नेटवर्क-18 चे नवे अध्यक्ष अदिल झैनुलभाई यांनाही रिलायन्स रिटेलच्या संचालक मंडळावर घेण्यात आलं आहे.

इशा अंबानी ही अमेरिकेतल्या येल विद्यापीठातून मानसशास्त्र आणि दक्षिण आशियाई परराष्ट्र व्यवहार या विषयाची पदवीधर आहे. याशिवाय तिनं न्यूयॉर्कच्या मॅकेन्झी या कंपनीत काही दिवस बिझनेस अॅनलिस्ट म्हणूनही काम पाहिलं आहे.

आकाश अंबानीनं ब्राऊन विद्यापीठातून अर्थशास्त्राची पदवी मिळवली आहे. त्याचप्रमाणे रिलायन्सच्या जिओच्या स्थापनेपासूनच या कंपनीत सक्रीय आहेत.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.