मुंबई गँगरेप: आरोपींना १९ सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी

मुंबई गँगरेप प्रकरणातील चार आरोपींना १९ सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात येणार आहे. किल्ला कोर्टानं हा निर्णय दिला. आज या आरोपींना कोर्टात हजर केल्यावर पोलिसांनी आरोपींची ओळख परेड घेण्यासाठी १९ सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी मागितली होती. कोर्टानं पोलिसांची ही विनंती मान्य केली.

| Updated: Sep 5, 2013, 12:39 PM IST

www.24taas.com , झी मीडिया, मुंबई
मुंबई गँगरेप प्रकरणातील चार आरोपींना १९ सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात येणार आहे. किल्ला कोर्टानं हा निर्णय दिला. आज या आरोपींना कोर्टात हजर केल्यावर पोलिसांनी आरोपींची ओळख परेड घेण्यासाठी १९ सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी मागितली होती. कोर्टानं पोलिसांची ही विनंती मान्य केली.
पोलीस कोठडीत असताना आरोपींची ओळख परेड करता येत नाही. त्यामुळं पोलिसांनी आरोपींची न्यायालयीन कोठडी मागितली होती. उद्या या सर्व आरोपींची ओळख परेड करण्यात येणार आहेत.
दरम्यान, आज आरोपींना कोर्टात हजर करण्यात येणार म्हणून किल्ला कोर्टाबाहेर पोलिसांचा चोख बंदोबस्त होता. कोर्टात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तिची चौकशी केली गेली. त्याचबरोबर कोर्टात येणाऱ्यांना किंवा कोणाचं कोर्ट प्रकरण असल्यास त्यांना दुपारनंतर कोर्टात येण्यास सांगितलं होतं.
जोपर्यंत गँगरेप प्रकरणातील आरोपींची सुनावणी पूर्ण होतं नाही. तोपर्यंत इतर प्रकरणाची सुनावणी केली जाणार नाही, असं कोर्टातील एका वरिष्ठ वकिलांनी सांगितलंय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.