सर्व मांगल मांगल्ये! घटस्थापनेसाठी मुहूर्त १० पर्यंतच!

आश्विन शुद्ध प्रतिपदा म्हणजेच नवदुर्गांच्या उत्सवाला आजपासून सुरुवात होत आहे. नवरात्रीनिमित्त संपूर्ण देशातच उत्साहाचं वातावरण आहे. देशातील सर्व शक्तीपिठांमध्ये रोषणाई करण्यात आलीय. राज्यातील साडेतीन शक्तीपीठांसह सर्व शहरांमध्येच देवीचा हा उत्सव साजरा करण्यासाठी, देवीची आराधना करण्यासाठी सर्वच सज्ज झालेय. 

Updated: Sep 25, 2014, 07:45 AM IST
सर्व मांगल मांगल्ये! घटस्थापनेसाठी मुहूर्त १० पर्यंतच! title=

मुंबई: आश्विन शुद्ध प्रतिपदा म्हणजेच नवदुर्गांच्या उत्सवाला आजपासून सुरुवात होत आहे. नवरात्रीनिमित्त संपूर्ण देशातच उत्साहाचं वातावरण आहे. देशातील सर्व शक्तीपिठांमध्ये रोषणाई करण्यात आलीय. राज्यातील साडेतीन शक्तीपीठांसह सर्व शहरांमध्येच देवीचा हा उत्सव साजरा करण्यासाठी, देवीची आराधना करण्यासाठी सर्वच सज्ज झालेय. 

नवरात्री उत्सवात राज्यात निवडणुकीची धामधूमही असणार आहे. आज घटस्थापनेच्या मुहूर्तावर अनेक उमेदवार आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. तर बहूप्रतिक्षित मनसेची ब्लू प्रिंटही आज जाहीर होणार आहे. 

पूजेचा मुहूर्त

यावर्षी प्रतिपदा दुपारी १ वाजून २२ मिनिटांनी संपणार असल्यानं घटस्थापनेसाठी सकाळी सूर्योदय म्हणजेच ६.२९ ते १० हाच सर्वोत्तम मुहूर्त आहे.

दुर्गा, शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, महिषासूरमर्दिनी, महाकाली... अशा विविध अवतारांत आपल्या पराक्रमाने नऊ दिवस युद्ध करून राक्षसांचा वध करणाऱ्या शक्तीदेवतेच्या उत्सवात पुणेकरांना संस्कृती, परंपरा आणि धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल अनुभवायला मिळणार आहे.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.