मोदींपेक्षा नेहरु, इंदिरा गांधी परदेशात जास्त लोकप्रिय होते : शिवसेना

देशाच्या विकासाला अधिक चालना ही नरसिंह राव आणि मनमोहन सिंग यांनी दिली आहे, असे उद्गार शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काढले. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी जरी लोकप्रियतेत पुढे असले तरी पंडित जवाहरलाल नेहरु, इंदिरा गांधी, राजीव गांधी हे देखील परदेशात तितकेच लोकप्रिय होते, असा टोला त्यांनी भाजपला हाणला.

Updated: Sep 29, 2015, 10:44 PM IST
मोदींपेक्षा नेहरु, इंदिरा गांधी परदेशात जास्त लोकप्रिय होते : शिवसेना title=

मुंबई : देशाच्या विकासाला अधिक चालना ही नरसिंह राव आणि मनमोहन सिंग यांनी दिली आहे, असे उद्गार शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काढले. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी जरी लोकप्रियतेत पुढे असले तरी पंडित जवाहरलाल नेहरु, इंदिरा गांधी, राजीव गांधी हे देखील परदेशात तितकेच लोकप्रिय होते, असा टोला त्यांनी भाजपला हाणला.

माजी पतंप्रधान नरसिंह राव आणि मनमोहन सिंग यांनी देशाच्या विकासासाठी मोलाची भूमिका बजावली आहे, अशी आठवण करुन देत उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारला पुन्हा एकदा जोरदार चिमटा काढला. 

मोदी यांच्या अमेरिका दौऱ्यावर मंगळवारी सामनाच्या अग्रलेखात भाष्य करण्यात आले. यावेळी शिवसेनेने भाजप टोला लगावला. दरम्यान, मोदी हे परदेशात लोकप्रिय असून ते अधिक वेगाने देशाला पुढे नेत असल्याचे सांगत उद्धव ठाकरेंनी मोदींचे अभिनंदनही केले आहे.

भाजपला चिमटा काढताना उद्धव ठाकरे यांनी नेत्यांचे कौतुक केले आहे. सोशल मीडिया, प्रसारमाध्यम हा प्रकार अस्तित्वात नव्हता त्या काळातही नेहरु, इंदिरा आणि राजीव गांधी हे परदेशात लोकप्रिय होते, याकडे त्यांनी लक्ष वेधले. कठिण काळात देशाच्या आर्थिक विकासाचा पाया नरसिंह राव आणि मनमोहन सिंग यांनीच रचला होता, असे उद्धव म्हणालेत.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.