विलेपार्ले येथील एक जण महाड दुर्घटनेत बेपत्ता

विलेपार्ले येथील एक जण महाड दुर्घटनेत बेपत्ता झाल्याची माहिती मिळत आहे. 

Updated: Aug 3, 2016, 10:00 PM IST
विलेपार्ले येथील एक जण महाड दुर्घटनेत बेपत्ता  title=

मुंबई : विलेपार्ले येथील एक जण महाड दुर्घटनेत बेपत्ता झाल्याची माहिती मिळत आहे. 

अविनाश मालप ( ४३ , रा. कुंकू वाडी एसआरए, नेहरू रोड, विलेपार्ले पूर्व) जयगड येथील आपल्या गावी आईला सोडण्यासाठी गेले होते. मुंबईला घरी परतत असताना ते दुर्घटनेत सापडले असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यांचा संपर्क होत नाही. 

ते एसटी ने मुंबईला येत होते. विलेपार्ले येथून मालप यांच्या कुटुंबातील काही सदस्य महाड घटनास्थळी रवाना झाले आहेत. आता सध्या त्यांच्या घरी फक्त वृद्ध वडील असल्याचे समजते. 

अधिक माहितीसाठी संपर्क नितिन डिचोलकर, शिवसेना शाखाप्रमुख, 9323286917 यांच्याशी साधावा.