पद्मश्री पुरस्कारासाठी बाबासाहेब पुरंदरेंच्या नावाची शिफारस

पद्मश्री पुरस्कारासाठी बाबासाहेब पुरंदरेंच्या नावाची शिफारस होण्याची शक्यता आहे.  बाबासाहेबांच्या कार्याची सर्व माहिती केंद्रीय गृहमंत्रालयानं मागवली आहे. त्यासंदर्भात केंद्रानं शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांना पत्र पाठवले आहे. 

Updated: Aug 19, 2015, 05:57 PM IST
पद्मश्री पुरस्कारासाठी बाबासाहेब पुरंदरेंच्या नावाची शिफारस title=

मुंबई : पद्मश्री पुरस्कारासाठी बाबासाहेब पुरंदरेंच्या नावाची शिफारस होण्याची शक्यता आहे.  बाबासाहेबांच्या कार्याची सर्व माहिती केंद्रीय गृहमंत्रालयानं मागवली आहे. त्यासंदर्भात केंद्रानं शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांना पत्र पाठवले आहे. 

बाबासाहेब पुरंदरे यांना पद्मश्री पुरस्कार देण्यात यावा, अशी मागणी शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनी १ मे २०१५ महाराष्ट्र दिन या दिवशी केंद्रीय गृह मंत्रालयाकडे केली होती. त्यांसदर्भात या हालचाली सुरू आहेत.  

दरम्यान, बाबासाहेब पुरंदरेंना देण्यात येणाऱ्या महाराष्ट्र भूषण पुरस्काराच्या तोंडावर जिजाऊ ब्रिगेडच्या महिलांनी मुंबईत राडा केलाय. सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांच्या शासकीय बंगल्यावरील कार्यालयात जिजाऊ ब्रिगेडच्या महिला घुसल्या. या महिलांनी कार्यालयात स्वत:ला कोंडून घेतलं.

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना जाहीर झालेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्काराविरोधात भूमिका घेणाऱ्या राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांचा मनसेनं निषेध केलाय. मुंबईत भारतमाता थिएटर चौकात मनसेच्यावतीने आंदोलन करण्यात आलं. पवारांविरोधात घोषणाबाजी करत त्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करण्यात आलं. यावेळी पोलिसांनी आंदोलक मनसे कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.

तर दुसरीकडे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंना यांच्या महाराष्ट्र भूषण पुरस्काराचा मार्ग मोकळा झालाय. बाबासाहेबांना जाहीर झालेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्कारविरोधी याचिका हायकोर्टानं फेटाळलीय. बाबासाहेबांच्या कार्याविषयी आणि पुरस्कारविरोधातली याचिका अर्थहीन असल्याचं निरीक्षण यावेळी हायकोर्टानं नोंदवलंय. ही याचिका केवळ प्रसिद्धीसाठी असल्याचा युक्तीवाद महाधिवक्ता अनिल सिंह यांनी केला. ही याचिका करणाऱ्या याचिकाकर्त्यांना कोर्टानं दहा हजार रुपयांचा दंड ठोठावलाय कोर्टाचा वेळ वाया घालवल्यानं कोर्टाकडून हा दंड ठोठावण्यात आलाय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.