मुंबई : गणपती बाप्पा मोरया, तिकीट नाही काढलं सांगू या... अशा घोषणा देत लोअर परेलच्या ब्रीजवरून काही तरूणांचा घोळका जात होता. पण त्यांना काही काळातच एक मोठा धक्का बसला. ब्रीजच्या कोपऱ्यावर तिकीट चेकर महिलांची एक टीम वाट पाहत होती.
बदामी कुर्ता, राखाडी पायजमा आणि राखाडी ओढणी हा महिला तिकीट चेकरचा गणवेश आहे. सर्व सामान्यपणे आपल्या पांढरा शर्ट आणि काळी पँट असलेल्या तिकीट चेकरची सवय आहे. पण ही महिला टीम अचानक तुमच्यासमोर येऊन तिकीट मागू शकते. त्यामुळे कोणत्याही विचित्र प्रसंगाला सामोरे जाण्यापूर्वी जबाबदार नागरीकाप्रमाणे तिकीट काढूनच जा.
लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी बहुतांशी गणेशभक्त तिकीट काढूनच येतात. पण आता गर्दीत असेल कोण आपल्याला पकडणार अशी काही टारगट मुलांची समजूत असते, पण या समजूतीला खोडून काढण्याचं काम रेल्वे प्रशासनाने केले आहे. मुंबईच्या कानाकोपऱ्यातून लोअर परेल, करी रोड स्टेशनवर लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी भाविक येत असतात. या गर्दीचा फायदा घेऊन काही विदाऊट तिकीट जाण्याचा फायदा घेतात.
मध्य आणि पश्चिम रेल्वेने अशा फुकट्या प्रवाशांना पकडण्यासाठी गणेशोत्सवात मोहीम आखली आहे. यामुळे रेल्वे प्रशासनाला मोठ्या प्रमाणात महसूलही मिळत आहे.
त्यामुळे लालबागच्या राजाच्या दर्शनाला ग्रुपने किंवा एकट्याने जात असाल तर तिकीट काढूनच जा, नाही तर मोठ्या दंडाचा फटका तुम्हांला या काळात बसण्याची शक्यता आहे.
विदाऊट तिकीटवाल्यांना बाप्पा आशीर्वाद देईल का?
देऊळबंद चित्रपटात स्वामी समर्थांचा एक डायलॉग आहे. सिग्नल पाळणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या पाठीशी मी उभा आहे. तसंच अशा प्रकारे विदाऊट तिकीट बाप्पाचे दर्शन घ्यायला येत असतील तर त्यांना खरंच बाप्पा पावणार का? त्यांना आशीर्वाद देईल का?
घ्या लालबागच्या राजाचे लाइव्ह दर्शन
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.