प्रीती झिंटा विनयभंग : अर्जुन साक्ष नोंदविणार?

प्रीती झिंटा आणि नेस वाडिया प्रकरणात आता एका नवीन वळणावर आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई पोलीस या प्रकरणात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर याचा जबाब रेकॉर्ड करण्याची शक्यता आहे.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Jun 20, 2014, 03:10 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
प्रीती झिंटा आणि नेस वाडिया प्रकरणात आता एका नवीन वळणावर आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई पोलीस या प्रकरणात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर याचा जबाब रेकॉर्ड करण्याची शक्यता आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये जेव्हा प्रीती आणि नेस वाडिया या दोघांमध्ये वाद सुरू होता तेव्हा तिथंच अर्जुन तेंडुलकरही उपस्थित होता. या प्रकरणात अर्जुनला एक साक्षीदार बनवलं जावं किंवा नाही, याबद्दल पोलीस अजूनही विचार करत आहेत.
या प्रकरणाची चौकशी करणारे मरीन ड्राईव्ह पोलिसांनी केलेल्या खुलाशानुसार, नेस वाडिया यांनी प्रीतीशी वाद घालताना सचिनचा ‘अल्पवयीन’ मुलगा अर्जुन यालाही शिव्या घातल्या होत्या. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 30 तारखेला मॅचचं व्हिडिओ फुटेज पाहिल्यानंतर नेस वाडिया यांनी प्रीती झिंटाशी वाद घालताना अर्जुननं त्यात हस्तक्षेप केला... जो वाडिया यांना आवडला नाही. त्यामुळे त्यांनी तिथंच अर्जुनाला अपशब्द वापरले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, अर्जुननं नेस वाडिया यांना प्रीतीशी वाद घालताना दुसऱ्यांना डिस्टर्ब करू नये, असं म्हटलं होतं. याच गोष्टीवर नाराज होऊन नेस वाडिया यांनी त्याला शिव्या घातल्या होत्या.
सचिनचा मुलगा अर्जुन तेंडुलकर मॅच पाहण्यासाठी अनेकदा वानखेडे स्टेडियमवर हजर असतो. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या महान क्रिकेटरचा मुलगा ही घटना घडली त्यावेळी बाजुलाच पॅव्हेलियन स्टँडजवळ उपस्थित होता.
नेस वाडियानं वानखेडे स्टेडियमवर सर्वांसमोर आपला विनयभंग केल्याची तक्रार प्रीती झिंटानं नोंदवलीय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.