पुण्यातील विमानतळाला छत्रपती संभाजी राजे यांचे नाव...

पुण्याजवळ पुरंदर येथे नवीन विमानतळाला मंजुरी मिळाल्यानंतर आज मराठा मोर्च्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या विमान तळाला छत्रपती संभाजी राजे यांचे नाव देणार असल्याचे जाहीर केले. 

Updated: Oct 6, 2016, 09:28 PM IST
पुण्यातील विमानतळाला छत्रपती संभाजी राजे यांचे नाव...

मुंबई : पुण्याजवळ पुरंदर येथे नवीन विमानतळाला मंजुरी मिळाल्यानंतर आज मराठा मोर्च्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या विमान तळाला छत्रपती संभाजी राजे यांचे नाव देणार असल्याचे जाहीर केले. 

सध्या राज्यात मराठा मोर्चा, मराठा आरक्षण हा विषय चर्चिला जात आहे. मराठा समाजाच्या तुष्टीकरणासाठी हा निर्णय घेतला असल्याचे राजकीय पंडितांचे मत आहे. 

नवी मुंबई विमानतळाच्या धर्तीवर  जमीन अधिग्रहण केले जाणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. तसेच या भागातील  शेतकरी यांना जमीनीसाठी पार्टनर म्हणून घेतले जाईल. 

भूमी अधिग्रहण झाल्यावर  3 वर्षात विमानतळ होणार आहे. 

पुरंदर विमानतळावर 4 किमीच्या दोन धावपट्टया असणार, याभागातील शेतकरी, उद्योजक, उद्योग यांना फायदा होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. 

विमानतळला पोहचण्यासाठी 8 मार्ग असतील यामुळे वाहतूक पर्याय उपलब्ध होतील, असेही त्यांनी सांगितले. यासाठी  2400 हेक्टर जागेची आवश्यकता आहे.  

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by clicking this link

Close