रमेश वळंजूंच्या पत्नीला सारस्वत बँकेने दिली नोकरी

बांद्रा येथील बॅण्डस्टॅण्डच्या समुद्रात सेल्फी काढण्याच्या नादात बुडणार्‍या मुलींना जीवाची पर्वा न करता वाचवताना शिवसेना कार्यकर्ते रमेश वळंजू यांचा मृत्यू झाला. त्यांचे कुटुंबीय वाऱ्यावर आले. मात्र, त्यांच्या कुटुंबीयांच्या मदतीला सारस्वत बँक धावून आली. त्यांच्या पत्नीला बॅंकेत नोकरी दिली.

Updated: Jan 16, 2016, 03:19 PM IST
रमेश वळंजूंच्या पत्नीला सारस्वत बँकेने दिली नोकरी   title=

मुंबई : बांद्रा येथील बॅण्डस्टॅण्डच्या समुद्रात सेल्फी काढण्याच्या नादात बुडणार्‍या मुलींना जीवाची पर्वा न करता वाचवताना शिवसेना कार्यकर्ते रमेश वळंजू यांचा मृत्यू झाला. त्यांचे कुटुंबीय वाऱ्यावर आले. मात्र, त्यांच्या कुटुंबीयांच्या मदतीला सारस्वत बँक धावून आली. त्यांच्या पत्नीला बॅंकेत नोकरी दिली.

सारस्वत बॅंकेने सामाजिक बांधिलकी जपत वळंजू यांच्या पत्नी कल्पना वळंजू यांना सारस्वत बँकेने नोकरी दिली आहे. त्यामुळे वळंजू कुटुंबाला मोठा दिलासा मिळालाय.

रमेश वळंजू हे कुटुंबातील एकमेव कमवणारी व्यक्ती होती. त्यांच्या पश्‍चात आई, पत्नी, दोन मुली आणि अडीच वर्षांचा मुलगा आहे. रमेश वळंजू यांच्या निधनाने कुटुंबाचा आधारच हिरावला आहे. सारस्वत बँकेचे उपाध्यक्ष व बोर्डाच्या मानव संसाधन समितीचे अध्यक्ष गौतम ठाकूर यांच्या सूचनेनुसार बँकेच्या उपकार्यकारी संचालिका स्मिता संधाने आणि परिमंडळ -१ च्या प्रमुख शिल्पा मुळगावकर यांनी वळंजू कुटुंबीयांची भेट घेतली. 

याआधी सारस्वत बँकेने एप्रिल २००८ मध्ये वांद्रे बॅण्डस्टॅण्ड येथे समुद्रात बुडणार्‍या दोन जोडप्यांना वाचवताना स्वतःचा जीव गमावणारे मालवणचे मोहन रेडकर यांच्या बंधूंना नोकरीत समावून घेतले होते. तसेच २६/११ च्या अतिरेकी हल्ल्यात शहीद झालेल्या पोलिसांच्या कुटुंबीयांनाही बँकेत नोकरी देऊन आधार दिलेला आहे.