रिलायन्सला मेट्रोचं भाडं वाढवण्याची मूभा

राज्य सरकारनं मेट्रोच्या दरवाढीविरोधात केलेली याचिका मुंबई हायकोर्टानं फेटाळून लावली आहे. त्यामुळं महिनाभराच्या सवलतीनंतर म्हणजे ९ जुलैपासून मेट्रोचे नवीन दर लागू होणार आहेत. 

Updated: Jun 25, 2014, 01:15 PM IST
रिलायन्सला मेट्रोचं भाडं वाढवण्याची मूभा title=

मुंबई : राज्य सरकारनं मेट्रोच्या दरवाढीविरोधात केलेली याचिका मुंबई हायकोर्टानं फेटाळून लावली आहे. त्यामुळं महिनाभराच्या सवलतीनंतर म्हणजे ९ जुलैपासून मेट्रोचे नवीन दर लागू होणार आहेत. 

आता नवीन दरानुसार मेट्रोच्या प्रवासासाठी किमान १० तर कमाल ४० रुपये मोजावे लागणार आहेत. सरकारनं नेमलेल्या भाडेवाढी संदर्भातल्या समितीचा अहवाल येईपर्यंत रिलायन्सची भाडेवाढ कोर्टानं वैध ठरवली आहे. 

मात्र यापूर्वी, काहीही झालं तरी मेट्रोची दरवाढ होऊ देणार नाही, अशी भूमिका राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी घेतली होती.

रिलायन्ससोबत झालेल्या करारानुसार मेट्रोचे जने दर सरसकट दहा रुपये होते. आता कोर्टाच्या निर्णयामुळं रिलायन्सला दरवाढवण्याची मुभा मिळाल्यामुळं मुंबईकरांना लोकलपाठोपाठ मेट्रोच्या प्रवासासाठीही जास्तीचे पैसे मोजावे लागणार आहेत. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.