Jio प्राइम मेंबर झाले ७ कोटी ग्राहक

दूरसंचार कंपनी रिलायन्स जिओची प्राइम सदस्यता घेणाऱ्यांच संख्या सात कोटी झाली आहे.  सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दहा कोटीपेक्षा अधिक ग्राहकांना जिओच्या मोफत इंटरनेटची सुविधा घेत होते. त्यातील सात कोटी जणांनी प्राइम सदस्यत्व घेतले आहे. 

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Mar 30, 2017, 09:38 PM IST
 Jio प्राइम मेंबर झाले ७ कोटी ग्राहक title=

नवी दिल्ली  : दूरसंचार कंपनी रिलायन्स जिओची प्राइम सदस्यता घेणाऱ्यांच संख्या सात कोटी झाली आहे.  सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दहा कोटीपेक्षा अधिक ग्राहकांना जिओच्या मोफत इंटरनेटची सुविधा घेत होते. त्यातील सात कोटी जणांनी प्राइम सदस्यत्व घेतले आहे. 

प्राइम सदस्यता घेण्यासाठी ग्राहकांनी ९९ रुपये दिले आहे. त्यानंतर त्यांना एक विशेष पॅक घ्यावा लागणार आहे.

९९ रुपये शुल्क भरून प्राइम मेंबरशीप 

जिओसाठी आता एक एप्रिलपासून शुल्क सुरू होणार आहे. पण सुरूवातीच्या ग्राहकांना जास्त फायदा होण्यासाठी त्यांनी ९९ रुपयांची प्राइम मेंबरशीप घ्यायची ऑफर दिली आहे. याती अंतीम तारीख ३१ मार्च आहे. 

अधिकृत आकडा ३१ मार्चनंतर 

जिओ प्राइमची सुविधा आतापर्यंत ५ कोटी ग्राहकांनी घेतल्याची अधिकृत माहिती आहे. त्यात आज आणि उद्यामध्ये आणखी ग्राहकांची वाढ होण्याची शक्यता आहे. हा आकडा सात कोटी रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. 

आकड्याने खुश जिओ 

नेमक्या किती ग्राहकांनी जिओची सदस्यता स्वीकारली याचा आकडा ३१ मार्चनंतर कळणार आहे. मोफत सेवा संपल्यावर ग्राहक जिओ सेवा सोडती असे वाटत होते पण सध्याचे आकडे पाहू आनंद वाटतो आहे.