सहआरोपी संजीव खन्नालाही नव्हती इंद्राणी-शीनाच्या खऱ्या नात्याची कल्पना

इंद्राणीच्या पहिल्या संबंधाची शीना आणि मिखाईल ही दोन मुलं... पण, अतिशय महत्त्वकांक्षी असलेल्या इंद्राणीसाठी ही दोघं लहानपणापासूनच जण मार्गातील अडथळे ठरत होते. त्यामुळेच, इंद्रानीनं जसं इतरांना अंधारात ठेवलं होतं तसंच संजीव खन्नालाही...

Updated: Aug 27, 2015, 12:44 PM IST
सहआरोपी संजीव खन्नालाही नव्हती इंद्राणी-शीनाच्या खऱ्या नात्याची कल्पना  title=

मुंबई : इंद्राणीच्या पहिल्या संबंधाची शीना आणि मिखाईल ही दोन मुलं... पण, अतिशय महत्त्वकांक्षी असलेल्या इंद्राणीसाठी ही दोघं लहानपणापासूनच जण मार्गातील अडथळे ठरत होते. त्यामुळेच, इंद्रानीनं जसं इतरांना अंधारात ठेवलं होतं तसंच संजीव खन्नालाही...

Peter and Indrani Mukerjeea
इंद्राणी आणि तिसरा नवरा पीटर

संजीव खन्ना हा इंद्राणीचा दुसरा पती... त्यालाही पोलिसांनी शिना बोरा हत्याकांडात सहआरोपी म्हणून अटक केलीय. शीनाचा खून झाला त्यावेळी संजीव खन्नाही गाडीतच उपस्थित होता. 

१९९० साली इंद्राणी आणि संजीव खन्ना यांची भेट झाली. १९९३ साली त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला. त्यांच्या लग्नाला इंद्राणीच्या कुटुंबातून अवघे काही जण उपस्थित होते. पण, इंद्राणीचे अगोदर कुणाशी संबंध होते आणि तिला या संबंधांतून दोन मुलंही आहेत, हे आपल्याला इंद्राणीला अटक झाल्यानंतरच समजल्याचं, संजीव खन्ना यानं म्हटलंय.

अधिक वाचा - शीना हत्याकांडातील हादरवून टाकणारे कंगोरे

इंद्राणीकडे शीना आणि मिखाईलच्या लहानपणीचा फोटो एकदा संजीवसमोर आला तेव्हा त्यालाही इंद्राणीनं हे दोघे आपले भाऊ-बहिण असल्याचं सांगितलं होतं.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.