सत्यपाल सिंहांचा राजीनामा, राजकारणाच्या वाटेवर

मुंबईचे पोलीस आयुक्त सत्यपाल सिंह यांनी राजीनामा दिलाय. गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्याकडे त्यांनी आपला राजीनामा सोपवलाय. सत्यपाल सिंह हे लवकरच राजकीय इनिंग सुरू करणार असल्याचीही चर्चा आहे.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Jan 31, 2014, 08:03 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
मुंबईचे पोलीस आयुक्त सत्यपाल सिंह यांनी राजीनामा दिलाय. गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्याकडे त्यांनी आपला राजीनामा सोपवलाय. सत्यपाल सिंह हे लवकरच राजकीय इनिंग सुरू करणार असल्याचीही चर्चा आहे.
मूळचे उत्तर प्रदेशातल्या मेरठचे असलेले सत्यपाल सिंह मुंबई किंवा उत्तरप्रदेश मधून लोकसभा निवडणूक लढविण्याची चर्चा आहे. यासंदर्भात त्यांना विचारलं असताना त्यांनी आपण राजीनामा दिलाय. मात्र, अद्यापपर्यंत तो मंजूर केला नसल्याची प्रतिक्रिया दिलीय. आपण राजीनाम्याचा निर्णय खूप विचारपूर्वक घेतला असून आपल्याला देशाची सेवा करायची असल्याचं, त्यांनी आपल्या प्रतिक्रियेत म्हटलंय.
महाराष्ट्र पोलीस दलात वेगवेगळ्या पदांवर काम केलेले सत्यपाल सिंह हे २०१५ मध्ये निवृत्त होणार होते. मात्र, त्यापूर्वीच त्यांनी राजीनामा दिलाय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.