नवी मुंबईच्या एसीजी मॉलमध्ये करा ४ खंडांची सफर

नवी मुबंईतील फॅशनचं सर्वात अद्यावत ठिकाण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सीवूड्स ग्रँड सेंट्रल (एसजीसी)  मॉलमध्ये आकर्षक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय फॅशन आणि जीवनशैली उपलब्ध करून देण्याची बांधिलकी जपत एसजीसी मॉलने आपल्या ग्राहकांसाठी १६ दिवसांच्या अनोख्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. यंदाच्या उन्हाळ्यात एसजीसी मॉलने २० मे २०१७ पासून सुरू होत असलेल्या त्यांच्या 'विंडोज टु द वर्ल्ड' या कार्यक्रमात आशिया, युरोप, आफ्रिका आणि अमेरिकेतील जादूई दुनियेची प्रचिती दिली जाणार आहे. प्रत्येक खंडाची प्रतिकृती उभारली जाणार असून त्यांच्याशी संबंधित खास उपक्रम आखण्यात आले आहेत.

Updated: May 25, 2017, 06:10 PM IST
नवी मुंबईच्या एसीजी मॉलमध्ये करा ४ खंडांची सफर title=

नवी मुंबई : नवी मुबंईतील फॅशनचं सर्वात अद्यावत ठिकाण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सीवूड्स ग्रँड सेंट्रल (एसजीसी)  मॉलमध्ये आकर्षक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय फॅशन आणि जीवनशैली उपलब्ध करून देण्याची बांधिलकी जपत एसजीसी मॉलने आपल्या ग्राहकांसाठी १६ दिवसांच्या अनोख्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. यंदाच्या उन्हाळ्यात एसजीसी मॉलने २० मे २०१७ पासून सुरू होत असलेल्या त्यांच्या 'विंडोज टु द वर्ल्ड' या कार्यक्रमात आशिया, युरोप, आफ्रिका आणि अमेरिकेतील जादूई दुनियेची प्रचिती दिली जाणार आहे. प्रत्येक खंडाची प्रतिकृती उभारली जाणार असून त्यांच्याशी संबंधित खास उपक्रम आखण्यात आले आहेत.

२३ मार्च २०१७ रोजी शानदार पद्धतीने लाँच झालेल्या एसजीसी मॉलमध्ये आतापर्यंत शंभर दालने सुरू झाले आहेत. नवी मुंबईतील रहिवाशांचे खरेदीचे सर्वोत्तम ठिकाण मिळण्याचे स्वप्न पूर्ण करत हा मॉल एकाच छताखाली प्रसिद्ध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय ब्रँड्स उपलब्ध करून देण्यासाठी सज्ज झाला आहे.

नवी मुंबईतील एसजीसी मॉलमध्ये झारा, एच अँड एम, फॉरेव्हर आणि अशा उदयोन्मुख ब्रँड्सनी आपले पहिलेवहिले दालन सुरू केले असून त्यामुळे नवी मुंबईच्या फॅशनचे रूप पालटणार आहे. नवी मुंबईतील लोकसंख्येचा सामाजिक- आर्थिक स्तर गेल्या काही वर्षांत उंचावला आहे. नवी मुंबईकरांना, त्यांच्या शहरातच, अगदी जवळ दर्जेदार फॅशन्स उपलब्ध करून देण्याचं काम या मॉलने केलं आहे. विविध मार्गांनी सहज पोहोचण्याच्या आवाक्यात असलेला हा मॉल नवी मुंबईतील प्रत्येकासाठी सोयीस्कर आहे. नजीकच्या काळात एसजीसी मॉलने आपल्या ग्राहकांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजनही केले आहे. 

हा मॉल सीवूड्स रेल्वे स्टेशनला जोडलेला आहेच, शिवाय तो बेलापूर सीबीडीपासून पाच मिनिटांवर, आठ पदरी सायन पनवेल द्रुतगर्त मार्गापासून जवळ आणि प्रस्तावित नवी मुंबई मेट्रो कॉरिडॉरपासून अतिशय जवळ आहे. एसजीसी मॉल हा नेक्सस मॉल पोर्टफोलिओचा एक भाग असून टीओडी कॉम्प्लेक्सचा एल अँड टीद्वारे विकास केला जात आहे.

नेक्सस मॉलची ही मालमत्ता शहराच्या रिटेल बाजारपेठेचा केंद्रबिंदू असून त्यात मनोरंजनाचे पर्याय, मल्टीप्लेक्स, एफ अँड बी पर्याय, बिग बाजार, लाइफस्टाइलसारखी अँकर स्टोर्स सीवूड्स रेल्वे स्थानकाच्या एक्झिट बाजूस येणाऱ्या- जाणाऱ्यांचे स्वागत करतात. त्यामुळे फॅशन आणि भव्यता यांचा संगम सोयीस्करपणे उपलब्ध झाला आहे. या चार मजली (तळमजला आणि दोन तसेच लोअर ग्राउंड फ्लोअरसह) मॉलमध्ये १६० रिटेल दालने, १५ रेस्टॉरंट्स आणि एकाच वेळेस १२०० माणसांच्या बसण्याची सोय होईल. मॉलमध्ये तीन स्तरीय बेसमेंट कार पार्किंग आहे, जिथे २८०० वाहने मावू शकतात. हे मुंबई मेट्रोपोलिटन रिजनमधील सर्वात मोठ्या पार्किंगपैकी एक मानले जाते.