मुंबई-पुणे प्रवास करणाऱ्यांना 'एसटी'चा 'दे धक्का'

शिवनेरी बसच्या प्रवास भाड्यात एसटी महामंडळाने हंगामी २० टक्क्यांची वाढ केली आहे. एसटी महामंडळाने मात्र ही भाववाढ १० टक्के केली असल्याचं म्हटलं आहे, तरी शिवनेरीची हंगामी भाडेवाढ २० टक्क्यांनी तर हिरकणीची भाडेवाढ १५ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

Updated: Nov 4, 2015, 08:25 PM IST
मुंबई-पुणे प्रवास करणाऱ्यांना 'एसटी'चा 'दे धक्का' title=

मुंबई : शिवनेरी बसच्या प्रवास भाड्यात एसटी महामंडळाने हंगामी २० टक्क्यांची वाढ केली आहे. एसटी महामंडळाने मात्र ही भाववाढ १० टक्के केली असल्याचं म्हटलं आहे, तरी शिवनेरीची हंगामी भाडेवाढ २० टक्क्यांनी तर हिरकणीची भाडेवाढ १५ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

एसटीने ऐन दिवाळीच्या तोंडी १० टक्के वाढ केली आहे, शिवनेरी बसच्या प्रवासासाठी प्रवाशांना २० टक्के जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. 

गणेशोत्सव आणि नाशिक कुंभमेळाव्या दरम्यान एसटीला १० कोटी रूपयांचा तोटा झाला आहे, अशी माहिती परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी दिली आहे. तोटा भरून काढण्यासाठी दिवाळीच्या तोंडावर हा निर्णय घेण्यात आला असल्याचं सांगण्यात येत आहे.

पाहा शिवनेरीच्या प्रवासासाठी आता किती पैसे मोजावे लागणार
एसटीच्या प्रवास भाड्यात १० टक्के वाढ तर एसी शिवनेरी बस प्रवास भाड्यात २० टक्के वाढ

मुंबई-पुणे आताचे हंगामी प्रवास भाडे रु. ५०४ (पूर्वीचे प्रवासभाडे रु. ४२०) 
ठाणे-स्वारगेट आताचे हंगामी प्रवास भाडे रु. ५०४ , (पूर्वीचे प्रवासभाडे रु. ४२०)
बोरिवली-स्वारगेट आताचे हंगामी प्रवास भाडे रु. ६१८, (पूर्वीचे प्रवासभाडे रु. ५१५)
पुणे-नाशिक  आताचे हंगामी प्रवास भाडे रु. ६९६, (पूर्वीचे प्रवासभाडे रु. ५८०)
पुणे-औरंगाबाद आताचे हंगामी प्रवास भाडे रु. ७५०, (पूर्वीचे प्रवासभाडे रु. ६२५)
पुणे-कोल्हापूर आताचे हंगामी प्रवास भाडे रु. ७५०,  (पूर्वीचे प्रवासभाडे रु. ६२५)
दादर-औरंगाबाद आताचे हंगामी प्रवास भाडे रु. १२४८, (पूर्वीचे प्रवासभाडे रु. १०४०)
दादर-अहमदनगर आताचे हंगामी प्रवास भाडे रु. ९०६, (पूर्वीचे प्रवासभाडे  रु. ७५५)
मुंबई-नागपूर आताचे हंगामी प्रवास भाडे रु. २१६०, (पूर्वीचे प्रवासभाडे रु. १८००)
सोलापूर-पुणे आताचे हंगामी प्रवास भाडे रु. ८०९, (पूर्वीचे प्रवासभाडे रु. ६७४) 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.