फक्त २०१३ रुपयांत करा देशांतर्गत विमानप्रवास!

भारतामध्ये हवाईप्रवास करू इच्छिणाऱ्यांसाठी ‘स्पाईसजेट’नं एक मस्त ऑफर दिलीय. यानुसार प्रवासी फक्त २०१३ रुपयांमध्ये देशांतर्गत विमान प्रवास करता येणार आहे.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Jan 12, 2013, 09:30 AM IST

www.24taas.com, मुंबई
भारतामध्ये हवाईप्रवास करू इच्छिणाऱ्यांसाठी ‘स्पाईसजेट’नं एक मस्त ऑफर दिलीय. यानुसार प्रवासी फक्त २०१३ रुपयांमध्ये देशांतर्गत विमान प्रवास करता येणार आहे.
एअरलाईन्सने ही ऑफर दहा लाख जागांसाठी राखीव ठेवली आहे. या ऑफरनुसार प्रवासी १ फेब्रुवारी ते ३० एप्रिल या काळात या ऑफरचा आनंद लुटू शकतात. त्यासाठी ११ जानेवारी ते १३ जानेवारीपर्यंत जेट कंपनीची तुम्हाला तिकिटं बूक करता येतील. कंपनीच्या वेबसाईटवर (www.spicejet.com) वर ही तिकिटं तुम्हाला उपलब्ध झाली आहेत. कंपनीच्या या घोषणेनंतर काही वेळातच थोड्या वेळातच कंपनीला ग्राहकांचा उत्तम प्रतिसादही मिळालाय.
या योजनेत ११ ते १३ जानेवारी दरम्यान बूक केलेली तिकीटेच ग्राह्य धरली जातील. तुम्ही ही तिकीटं एअरलाईन्सच्या वेबसाईटवर ऑनलाइन किंवा ट्रॅवल एजन्सीद्वारे बूक करु शकता. पण, हा प्रवास तुम्हाला १ फेब्रुवारी ते ३० एप्रिल या कालावधीतच करावा लागेल. ही ऑफर फक्त डायरेक्ट फ्लाइटसाठीच लागू असेल. `व्हाया` आणि `ऑनवर्ड फ्लाइट` मान्य होणार नाही. आंतरराष्ट्रीय उड्डाणांसाठी ही ऑफर लागू नाही.

एखाद्या व्यक्तीच्या नावावर तिकीट बूक केलेले असेल तर फक्त त्यालाच प्रवास करता येईल. त्याच्या कुटुबियांना अथवा इतरांना प्रवास करता येणार नाही. तिकीट रद्द करणे अथवा प्रवास तारखेत बदल करायचा असेल तर निर्धारित शुल्क द्यावे लागेल. ही ऑफर फक्त एफआयटी बुकिंगसाठी वैध असेल. या ऑफरमध्ये सामूहिक (ग्रुप) बुकिंगची सोय नाही.