गणेशोत्सवासाठी एसटीची ग्रुप आरक्षण सुविधा

कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी कोकण रेल्वे मार्गावर विशेष रेल्वे सोडण्यात आल्यानंतर आता एसटीनेही तशी तयारी केली आहे. गणेश भक्तांसाठी ग्रुप आरक्षणची सुविधा एसटीने उपलब्ध करुन दिली आहे. दि. २४ जुलैपासून २४ ऑगस्टचे नियमित आरक्षण सुरु होत आहे, अशी माहिती जनसंपर्क अधिकारी यांनी दिली आहे.

Updated: Jul 23, 2014, 05:45 PM IST
गणेशोत्सवासाठी एसटीची ग्रुप आरक्षण सुविधा title=

मुंबई : कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी कोकण रेल्वे मार्गावर विशेष रेल्वे सोडण्यात आल्यानंतर आता एसटीनेही तशी तयारी केली आहे. गणेश भक्तांसाठी ग्रुप आरक्षणची सुविधा एसटीने उपलब्ध करुन दिली आहे. दि. २४ जुलैपासून २४ ऑगस्टचे नियमित आरक्षण सुरु होत आहे, अशी माहिती जनसंपर्क अधिकारी यांनी दिली आहे.

२२ जुलैपर्यंत १२८५ एसटी आरक्षण कऱण्यात आले आहे. यामध्ये मुंबई विभागातून ६५०, ठाणे २८८, पालघर ७९ आदी गाड्यांचे आरक्षण झाले आहे. दरम्यान, ग्रुप आरक्षण सुरु असून अद्याप २६८ बसेस ग्रुप आरक्षणासाठी उपलब्ध आहेत, अशी माहिती देण्यात आली. 

हे आरक्षण उद्या २४ जुलै रोजी २४ ऑगस्टचे नियमित आरक्षण सुरु होत आहे. आरक्षण एसटीच्या तसेच सर्व अधिकृत खासगी आरक्षण केंद्रांवर उपलब्ध होईल, असे जनसंपर्क अधिकाऱ्यांनी सांगितले. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.