जीएसटीवर राज्य विधीमंडळाचं विशेष अधिवेशन

येत्या१७ ते १९ मे दरम्यान हे अधिवेशन होईल. 

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Apr 25, 2017, 04:51 PM IST
जीएसटीवर राज्य विधीमंडळाचं विशेष अधिवेशन  title=

मुंबई : १ जुलै रोजी देशात लागू होणाऱ्या जीएसटी करप्रणालीसाठी आवश्यक असणारी विधेयकं, मंजूर करण्यासाठी राज्याच्या विधीमंडाळचं विशेष अधिवेशन बोलवण्यात आलं आहे. येत्या१७ ते १९ मे दरम्यान हे अधिवेशन होईल. 

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात केंद्र सरकार करप्रणालीसाठी आवश्यक चार विधेयकं मंजूर केली. त्यापैकी SGST म्हणजेच स्टेट जीएसटी विधेयक राज्यांमध्येही मंजूर करणं आवश्यक आहे. त्यामुळे विधीमंडळाचं विशेष अधिवेशन बोलवण्यात येतय.