हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी

 हृदयाच्या प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया मुलुंडच्या फोर्टिस हॉस्पिटलमध्ये यशस्वीरीत्या पार पडलीय. मात्र यानिमित्तानं घड्याळाच्या काट्यावर धावणारी मुंबईदेखील थांबू शकते याचा अभूतपूर्व अनुभव मुंबईकरांना आला. 

Updated: Aug 4, 2015, 12:12 AM IST
हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी title=

पुणे :  हृदयाच्या प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया मुलुंडच्या फोर्टिस हॉस्पिटलमध्ये यशस्वीरीत्या पार पडलीय. मात्र यानिमित्तानं घड्याळाच्या काट्यावर धावणारी मुंबईदेखील थांबू शकते याचा अभूतपूर्व अनुभव मुंबईकरांना आला. 

अन्वर खान या रुग्णावर हृदय प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया होणार होती. त्यासाठी 23 मिनिटांत पुण्याहून मुंबईला विमानानं हृदय आणण्यात आलं. मात्र मुलुंडच्या फोर्टिस रुग्णालयात हे हृदय पोहचवण्याचं सर्वात मोठं आव्हान होतं. कारण मुंबईतली वाहतूक समस्या सर्वश्रूत आहे. 

मात्र या समस्येवर मुंबईतल्या वाहतूक पोलिसांनी यशस्वीरीत्या मात करत ग्रीन कॉरिडॉर तयार केला. आणि विमानतळ ते मुलुंडपर्यंतचे 20 किलो मीटरचे अंतर केवळ 18 मिनिटांत पार केलं. 

एका हृदयासाठी मुंबईचा ठोका थांबल्याची ही पहिलीच घटना असून केवळ पोलिसांच्या योग्य समन्वयामुळंच हे शक्य झालं. त्यामुळं मुंबई वाहतूक पोलिसांचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. यापूर्वी चेन्नईमध्येही हृदय प्रत्यारोपणासाठी अशा प्रकारेच अर्धा तासासाठी संपूर्ण वाहतूक थांबवण्यात आली होती. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.