जुलैपर्यंत राज्यातले सर्व स्विमिंग पूल बंद ठेवण्याचे निर्देश

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर राज्यात यंदा कोरडी होळी खेळण्याचं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलंय. राज्यात जलजागृती अभियानाची सुरूवात करताना मुख्यमंत्र्यांनी हे आवाहन केलंय.  

Updated: Mar 16, 2016, 12:04 PM IST
जुलैपर्यंत राज्यातले सर्व स्विमिंग पूल बंद ठेवण्याचे निर्देश title=

मुंबई : दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर राज्यात यंदा कोरडी होळी खेळण्याचं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलंय. राज्यात जलजागृती अभियानाची सुरूवात करताना मुख्यमंत्र्यांनी हे आवाहन केलंय.  

याशिवाय जुलैपर्यंत राज्यातले सर्व स्विमिंग पूल बंद ठेवण्याचे निर्देश काढणार असल्याचं जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितलंय. शिवाय होळीच्या निमित्तानं रेन डान्सवरही बंदी घालण्याचं पत्र पालिकांना देणार असल्याचं महाजन यांनी म्हटलंय. 

येत्या 22 मार्चला जागतिक जलदिन साजरा होणार आहे. त्यानिमित्तानं दुष्कळाच्या पार्श्वभूमीवर राज्यात आजपासून जलजागृती सप्ताह सुरू करण्यात आलाय.