कृपांना पुरावे नष्ट करायला दिला वेळ - राऊत

कृपाशंकर यांच्यावरील कारवाईला जाणिवपूर्वक उशीर झाल्याचा आरोप शिवसेनेनं केला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर कृपांवर तातडीनं कारवाई न करता त्यांना पुरावे नष्ट करण्यासाठी वेळ दिला गेला असा आरोप शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला आहे.

Updated: Mar 2, 2012, 02:01 PM IST

www.24taas.com, मुंबई

कृपाशंकर यांच्यावरील कारवाईला जाणिवपूर्वक उशीर झाल्याचा आरोप शिवसेनेनं केला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर कृपांवर तातडीनं कारवाई न करता त्यांना पुरावे नष्ट करण्यासाठी वेळ दिला गेला असा आरोप शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला आहे.

त्यामुळं मुंबईचे पोलीस आयुक्त आणि काँग्रेस नेत्यांची चौकशी करण्यात यावी अशी मागणी शिवसेनेनं केली आहे. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष कृपाशंकर सिंह यांच्या मुंबईतील दोन घरांवर  आणि ऑफिसवर आज छापा मारण्यात आला. बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने हा मारला छापा मारला.

दरम्यान, कृपाशंकर यांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी होणार आहे. ऑफिसमधील काही कागदपत्रं जाळण्यात आल्याचा आरोप होत होता. आज सकाळी बांद्रामधील साई प्रसाद आणि पार्ला येथील घर आणि ऑफिसवर टाकले छापे टाकले.