आम्हाला आदर्श इमारत बांधयची नाही- उद्धव ठाकरे

रेसकोर्सवर थीम पार्क उभारण्यासंदर्भात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे राज्यपालांना भेटणार आहेत.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Jun 23, 2013, 10:07 PM IST

www.24taas,com, झी मीडिया, मुंबई
रेसकोर्सवर थीम पार्क उभारण्यासंदर्भात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे राज्यपालांना भेटणार आहेत. आम्हाला मोकळ्या जमिनीवर आदर्शसारखी इमारत उभी करायची नसून मोकळ्या जमिनी मोकळ्याच ठेवायच्या आहेत. असं सांगत त्यांनी सत्ताधा-यांना टोला लगावला.
तसंच शिवसैनिकांना त्यांच्या मतदार संघातील बोगस मतदार शोधून काढण्याच्या सुचनाही त्यांनी केल्या. काल शिवसेनेची लोकसभा निवडणूक पूर्वतयारीची बैठक झाली. त्या पार्श्वभूमीवर हे आदेश त्यांनी दिले. उत्तराखंडातील घटनेवर कोणीही राजकारण करु नये. असे त्यांनी आवाहन केले.
एनडीएचे समन्वयक म्हणून नाव चर्चेत असल्याबद्दलचा मुद्दा त्यांनी फेटाळून लावला. अंधेरी स्पोर्टस कॉम्प्लेक्समध्ये कार्यक्रमासाठी ते आले होते.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.