रिझर्वेशन करून काळा पैसा पांढरा करणाऱ्यांना पश्चिम रेल्वेचा दणका

पाचशे आणि हजार रुपयांच्या जुन्या नोटा चलनातून रद्द केल्यानंतर काही जणांनी काळा पैसा पांढरा करण्यासाठी पश्चिम रेल्वेवर तिकीटांचं बूकिंग मोठ्या प्रमाणावर करण्यात आलं.

Updated: Nov 10, 2016, 01:42 PM IST
रिझर्वेशन करून काळा पैसा पांढरा करणाऱ्यांना पश्चिम रेल्वेचा दणका title=

मुंबई : पाचशे आणि हजार रुपयांच्या जुन्या नोटा चलनातून रद्द केल्यानंतर काही जणांनी काळा पैसा पांढरा करण्यासाठी पश्चिम रेल्वेवर तिकीटांचं बूकिंग मोठ्या प्रमाणावर करण्यात आलं. यामुळे आता पश्चिम रेल्वेवर 13 तारखेनंतरचं एसी फर्स्ट क्लासचं कॅश काऊंटरवरचं रिझर्वेशन बंद करण्याचा निर्णय रेल्वेनं घेतला आहे.

एवढच नाही तर 50 हजारांपेक्षा जास्तचं तिकीट खरेदी करायचं असेल किंवा रिझर्वेशन कॅन्सल करायचं असेल तर पॅन कार्ड दाखवणं बंधनकारक करण्यात आलं आहे. कालच्या एकाच दिवसामध्ये पश्चिम रेल्वेवर एक कोटी 80 लाख रुपयांची खरेदी झाली. 8 तारखेला म्हणजेच जेव्हा नोटांबाबतचा हा निर्णय जाहीर झाला नव्हता तेव्हा सकाळी 8 ते दुपारी 2 पर्यंत 80 लाख रुपये रिझर्वेशनच्या माध्यमातून जमा झाले होते.