'डॅडी'ला भेटला म्हणून अभिनेता अर्जुन रामपालला पोलिसांची नोटीस

अंडरवर्ल्ड डॉन अरूण गवळीची भेट घेतल्यानं अभिनेता अर्जुन रामपालला पोलिसांनी नोटीस बजावलीय. पूर्वपरवानगी न घेता २९ डिसेंबर रोजी रामपालनं जेजे हॉस्पिटलमध्ये गवळीची भेट घेतली होती. 

Updated: Feb 4, 2015, 11:10 AM IST
'डॅडी'ला भेटला म्हणून अभिनेता अर्जुन रामपालला पोलिसांची नोटीस title=

मुंबई: अंडरवर्ल्ड डॉन अरूण गवळीची भेट घेतल्यानं अभिनेता अर्जुन रामपालला पोलिसांनी नोटीस बजावलीय. पूर्वपरवानगी न घेता २९ डिसेंबर रोजी रामपालनं जेजे हॉस्पिटलमध्ये गवळीची भेट घेतली होती. 

२९ डिसेंबरला अरूण गवळी रुटीन चेकअपसाठी जेजे हॉस्पिटलमध्ये आला होता. त्याच दरम्यान तब्बल १ तास अर्जुन रामपालनं गवळीसोबत चर्चा केली. अर्जुन रामपाल अरूण गवळीच्या जीवनावर आधारित तयार होत असलेल्या 'डॅडी' चित्रपटात अरूण गवळीची भूमिका साकारणार आहे. 

अरूण गवळी नगरसेवक कमलाकर जमसंदेकर हत्या प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगतोय. पोलिसांनी या भेटीच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. तसंच तिथं सुरक्षेसाठी उपस्थित असलेल्या पोलिसांचीही चौकशी होणार आहे. सहपोलीस आयुक्त धनंजय कमलाकर यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.