मुलाच्या मित्रावर महिलेचा लैंगिक अत्याचार

मुंबईतील चेंबूर मध्ये एका ३६ वर्षीय महिलेने आपल्या मुलाच्या मित्रावर लैगिक अत्याचार केले असल्याची विचित्र घटना समोर आली आहे. 

Updated: Apr 2, 2015, 10:15 PM IST
मुलाच्या मित्रावर महिलेचा लैंगिक अत्याचार title=

मुंबई : मुंबईतील चेंबूर मध्ये एका ३६ वर्षीय महिलेने आपल्या मुलाच्या मित्रावर लैगिक अत्याचार केले असल्याची विचित्र घटना समोर आली आहे. गेल्या तीन महिन्यापासून महिला या मुलावर लैंगिक अत्याचार करत होती. मुलाने चेंबूरच्या आरसीएफ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केल्यावर पोलिसांनी बाल अत्याचार कायद्याखाली सदर महिलेस अटक केली आहे. तर बाल लैगिक अत्याचार कायदा अस्तित्वात आल्यानंतरचा हा पहिलाच असा गुन्हा दाखल झाला आहे ज्यात महिला आरोपी आहे. 

चेंबूरच्या वाशी नाका परिसरात पीडित मुलगा राहतो. हा मुलगा १५ वर्षाचा असून या मुलाचा मित्र याच परिसरात राहतो. दोघांचेही एकमेकांच्या घरी ये जा होत असे. एकत्रच खेळत असत तसेच शाळेत सुद्धा सोबत जात असत. मात्र या मित्राच्या आईची नजर या मुलावर वेगळ्या भावनेने होती. एक दिवस हा मुलगा मित्राच्या घरी गेला असता मित्राच्या आईने त्याला शीतपेयातून गुंगीचे औषध दिले आणि त्याच्या सोबत अश्लील चाळे केले आणि हे सर्व मोबाईल मध्ये क्लीप तयार केली.   

हा मुलगा शुद्धीवर आल्यावर त्याला या सगळा प्रकार समाजाला पण या महिलेने त्याला मोबाईल मधील आक्षेपार्ह व्हिडियो क्लिप  दाखविली आणि जर तू कोणाला सांगितले तर मी पोलिसात तक्रार देईल असे सांगून त्याला चूप केले आणि वासनेसाठी त्याला बोलावू लागली हा प्रकार गेले दोन ते तीन महिने सुरू होता. या प्रकार मुले पीडित मुलगा तणावाखाली राहू लागला अखेर त्याने आपल्या घरच्यांना हा प्रकार सांगितला असता त्यावर त्या महिलेच्या विरोधात आर सी एफ पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यावर पोलिसांनी तीन दिवस वेळ घेवून बुधवारी रात्री त्या महिलेच्या विरोधात गुन्हा केला आणि गुरुवारी सकाळी तिला अटक केली बाल लैंगिक अत्याचार ४ / ८ / १२ आणि भा द वि ५०६ अंतर्गत गुन्हा नोंदवला असल्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिलीप राऊत यांनी सांगितले. 

आरोपी महिला ही एकटीच राहते तिने या पूर्वी याच पोलिस ठाण्यात आपल्या पती विरुध्द बलात्काराची तक्रार दिली होती. या विचित्र कृत्यामुळे या महिलेच्या प्रती समाजात घृणा निर्माण झाली आहे हे मात्र नक्की 
 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.