धावत्या ट्रेनमधल्या टॉयलेटमध्ये महिलेची प्रसूती

प्रत्येक आईच्या काळजाचा ठोका चुकवणारी. 26 वर्षांच्या चंदना शाह रत्नागिरीहून दादरला येत होत्या तेव्हा रोह्याजवळच्या कुसा स्टेशन जवळ ट्रेन पोहोचली असताना ट्रेनमधल्या टॉयलेटमध्येच चंदना शाह यांची प्रसूती झाली.

Updated: Apr 26, 2017, 10:29 PM IST
धावत्या ट्रेनमधल्या टॉयलेटमध्ये महिलेची प्रसूती title=

मुंबई : प्रत्येक आईच्या काळजाचा ठोका चुकवणारी. 26 वर्षांच्या चंदना शाह रत्नागिरीहून दादरला येत होत्या तेव्हा रोह्याजवळच्या कुसा स्टेशन जवळ ट्रेन पोहोचली असताना ट्रेनमधल्या टॉयलेटमध्येच चंदना शाह यांची प्रसूती झाली.

धक्कादायक बाब म्हणजे नुकतं जन्मलेलं हे बाळ टॉयलेटमधून खाली ट्रॅकवर पडलं. चंदना यांनी आरडाओरडा करताच ट्रेन थांबली. सगळेजण धावत ट्रॅकवर पोहोचले. 

ट्रॅकवर पडलेलं ते बाळ सुखरुप होतं.... कुसा गावचे रहिवासी, रेल्वे कर्मचारी यांच्या मदतीने बाळाला आणि आईला रुग्णालयात दाखल करण्यात आलं.... आता आई आणि बाळ दोघेही सुखरुप आहेत.