पुढील वर्षापासून शालेय अभ्यासक्रमात योग असणार - तावडे

पुढील वर्षापासून शालेय अभ्यासक्रमात योगाचे धडे आणण्याचा आम्ही विचार करीत असल्याचं शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी सांगितलं. याबाबत शिक्षणतज्ज्ञ, योग तज्ज्ञ आदी संबंधितांशी सविस्तर चर्चा करुन त्यानंतर निर्णय घेण्यात येईल, असंही ते म्हणाले.

Updated: Jun 21, 2015, 03:08 PM IST
पुढील वर्षापासून शालेय अभ्यासक्रमात योग असणार - तावडे title=

मुंबई: पुढील वर्षापासून शालेय अभ्यासक्रमात योगाचे धडे आणण्याचा आम्ही विचार करीत असल्याचं शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी सांगितलं. याबाबत शिक्षणतज्ज्ञ, योग तज्ज्ञ आदी संबंधितांशी सविस्तर चर्चा करुन त्यानंतर निर्णय घेण्यात येईल, असंही ते म्हणाले.

आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्तानं विलेपार्ले पूर्व इथल्या मुंबई महापालिकेच्या दीक्षित शाळेमध्ये शिक्षणमंत्री तावडे उपस्थित होते. यावेळी इथं आयोजित कार्यशाळेत सहभागी होत त्यांनी स्वत शाळेतील विद्यार्थ्यांबरोबर योगा केला. यावेळी आमदार पराग अळवणी तसंच शाळेतील शिक्षक आणि पालक मोठ्या संख्येनं उपस्थित होतं.

यावेळी बोलतांना तावडे म्हणाले, योगाभ्यास हा लहान वयापासून सुरु केल्यास त्याचे अधिक महत्त्व आहे. विद्यार्थ्यांनी योगाभ्यास केल्यास त्यांना आपल्या अभ्यासावर आणि वाचनावर अधिक जास्त प्रमाणात लक्ष केंद्रीत करता येतो, त्याचा त्यांना त्यांच्या अभ्यासामध्ये नक्कीच फायदा होईल. योगा हे एक शिक्षण आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर योगाचं महत्त्व आता जगाला कळलं आहे. योगाचे धडे अभ्यासक्रमामध्ये आणण्याबाबत आमचा विचार सुरु आहे, त्यादृष्टीनं संबंधितांशी चर्चाही सुरु आहे. शाळांमध्ये असलेल्या शारीरीक शिक्षणाच्या तासामध्ये योगाभ्यास सुरु करता येईल का? याबाबतही विचार विनिमय सुरु आहे. लवकरच याबाबत आम्ही निर्णय घेऊ असंही त्यांनी स्पष्ट केलं.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.