संजय दत्तला माफ करा- काटजू

अभिनेता संजय दत्त याला १९९२ साली झालेले बॉम्बस्फोट आणि दंगली संदर्भात अवैध शस्त्र बाळगल्याबद्दल सुप्रीम कोर्टाने ५ वर्षांची शिक्षा ठोठावली आहे. मात्र संजय दत्तला माफ करावे अशा आशयाचं पत्र प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष आणि माजी न्यायमूर्ती मार्कंडेय काटजू यांनी राज्यपालांना पाठवलं आहे.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Mar 21, 2013, 11:38 PM IST

www.24taas.com, मुंबई
अभिनेता संजय दत्त याला १९९२ साली झालेले बॉम्बस्फोट आणि दंगली संदर्भात अवैध शस्त्र बाळगल्याबद्दल सुप्रीम कोर्टाने ५ वर्षांची शिक्षा ठोठावली आहे. मात्र संजय दत्तला माफ करावे अशा आशयाचं पत्र प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष आणि माजी न्यायमूर्ती मार्कंडेय काटजू यांनी राज्यपालांना पाठवलं आहे. या पत्रावरून वाद होण्याची शक्यता आहे.
राज्यपालांनी मध्यस्ती केल्यास सुप्रीम कोर्ट संजय दत्तला माफ करू शकते, त्यामुळे आपण संजय दत्त याच्या माफीसाठी प्रयत्न करावेत, असं मार्कंडेय काटजूंनी पत्रात लिहिलं आहे.

संजय दत्तला ५ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. संजय दत्त आता पुनर्विचार याचिका दाखल करणार असल्याचे समजते आहे. शिक्षेवर पुनर्विचार करण्यात यावा यासाठी त्याने शेवटचा प्रयत्न म्हणून याचिका दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. शिक्षा कमी करुन घेण्यासाठी हा त्याचा शेवटचा प्रयत्न असेल. नाहीतर आणखी साडेतीन वर्ष त्याला शिक्षा भोगावी लागणार आहे. संजय दत्तचे वकील सतीश मानेशिंदे हे पुनर्विचार याचिका दाखल करणार आहेत