पोलंड-ग्रीस बरोबरीत, रशियाचं 'एक पाऊल पुढे'

पोलंड आणि ग्रीस यांच्यातील युरो कपची सलामीची मॅच १-१ नं बरोबरीत सुटली. गोलच्या धडाक्यापेक्षा या मॅचमध्ये यल्लो आणि रेड कार्डचा धडाका दिसला.

Updated: Jun 9, 2012, 09:08 AM IST

 www.24taas.com, वॉर्सा

 

पोलंड आणि ग्रीस यांच्यातील युरो कपची सलामीची मॅच १-१ नं बरोबरीत सुटली. गोलच्या धडाक्यापेक्षा या मॅचमध्ये यल्लो आणि रेड कार्डचा धडाका दिसला. खराब सुरुवातीनंतर जोरदार कमबॅक करणा-या ग्रीसला विजयी सलामी देण्यात मात्र अपयश आलं. पोलंड आणि ग्रीस यांच्यातील मॅचमध्ये यजमान पोलिश टीमलाच विजयसाठी सर्वाधिक पसंती देण्यात आली होती. पोलिश टीमनं मॅचच्या सुरुवातीपासूनचं आपली आक्रमण वाढवली. त्यांच्या टीमनं गोल गोलपोस्टमध्ये बॉल टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांच्या पहिल्या प्रयत्नाला यश काही मिळालं नाही. त्यानंतर ग्रीसनही मॅचवर आपली पकड मजबूत करण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरु केले.

 

मात्र, त्यांच्या टीमला यजमानांचा बचाव भेदता आला नाही. दोन्ही टीम्स एकेमेकांवर कुरघोडी करण्याच्या प्रयत्नात होते. आणि अखेर यजमानांच्या प्रयत्नांना यश आलं आणि रॉबर्ट लिवान डोवस्कीनं हेडरवर शानदार गोल करत पोलिश टीमला आघाडी मिळवून दिली. पहिल्या हाफवर पोलंडनं आपला दबदबा कायम ठेवला. मात्र, ग्रीसनं दुस-या हाफमध्ये अनपेक्षितरित्या कमबॅक केला. पोलंडच्या स्पीड आणि एनर्जीचं पहिल्या हाफमध्ये काहीच उत्तर नसणा-या ग्रीसनं सेकंड हाफमध्ये अचानक मुसंडी मारली. आणि ५१ व्या मिनिटाला बदली फुटबॉलपटू म्हणून आलेल्या दिमित्रीस साल पिन गिडीसनं मैदानी गोल करत ग्रीसला १-१ अशी बरोबरी साधून दिली.

 

एकीकडे ग्रीस कमबॅक करण्यासाठी लढत असतांना मैदानावरचं नाट्यही चांगलचं रंगलं होतं. सेकंड हाफमध्ये ग्रीसनं आणखी एक गोल केला मात्र, रेफ्रींनी तो ऑफ साईड ठरवला. त्यातच त्यांच्या टीमला चार यल्लो कार्ड आणि एक रेड कार्ड मिळालं. त्यामुळे त्यांना मैदानावर दहा फुटबॉलपटूंसह खेळाव लागलं. तर पोलंडच्या गोलफिपरलाही रेड कार्ड मिळालं. याच रेड कार्डनंतर लगेचच ग्रीसला एक पेनल्टीही मिळाली मात्र बदली गोलफिपरनं ग्रीसचा हा प्रयत्न हाणून पाडला. आणि ग्रीसचं विजयी सलामी देण्याचं स्वप्न भंग पावलं.

 

तर  दुसऱ्या मॅचमध्ये  रशियानं चेक रिपब्लिकचा ४-१ नं धुव्वा उडवत युरो कपमध्ये धडाक्याति विजयी सलामी दिली. २१ वर्षीय ऍलन झगोव्ह रशियाच्या विजयाचा ख-या अर्थानं शिल्पकार ठरला. मॅचमध्ये दोन गोल झळकवत त्यानं रशियाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. झगोव्हबरोबरच शिराकोव्ह आणि रोमन पाऊलूचेन्कोनं प्रत्येकी एकेक गोल केला. युरो कपची रशिया विरुद्ध चेक रिपब्लिक ही मॅच फुटबॉलप्रेमींसाठी फुल ऑफ ऍक्शन पॅक्ड ठरली. या मॅचमध्ये गोलची बरसात फुटबॉलच्या सच्चा चाहत्यांना पाहायला मिळाली. रशियानं या मॅचमध्ये एकामागून एक तब्ब्ल चार गोल केले. आणि चेक रिप्बलिकला आपल्या पहिल्याच मॅचमध्ये मानहानिकारक पराभवाला सामोर जाव लागलं. या मॅचमध्ये अपेक्षेप्रमाणे रशियानं धडाक्यात सुरुवात केली.

 

मॅचच्या १५ व्या मिनिटालाच रशियन फुटबॉल फ्युचर असलेल्या ऍलन झगोव्हनं गोल झळकावत आपल्या टीमला १-० नं आघाडी मिळवून दिली. त्यानंतर २४ व्या मिनिटाला रोमन शिरो कोव्हनं गोल करत रशियाची आघाडी २-० नं वाढवली. पहिल्या हाफमध्ये २-० नं आघाडी घेतल्यानंतर सेकंड हाफमध्ये चेक रिप्बलिकला मॅचमधील पहिला गोल नोंदवण्यात यश आलं. चेकचा हा मॅचमधील पहिला आणि शेवटचा गोल ठरला. सेकंड हाफमध्ये ७९ व्या मिनिटाला पुन्हा एकदा झगोव्हनं गोल करत रशियाचा विजय जवळपास निश्चित केला. तर ८२ व्या मिनिटाला रोमन पावलू चेन्कोनं गोल करत रशियाच्या विजयावर शिक्कोमोर्तब  केलं. रशियानं आपल्या जोरदार आक्रमणांच्या जोरावर चेकचा कमकुवत बचाव मोडित काढला. तर कमकुवत बचाव हाच चेक रिप्बलिकच्या पराभवाचं कारण ठरलं. या विजयासह रशियानं युरो कपमध्ये परफेक्ट स्टार्ट मिळवली आहे. आता आगामी मॅचेसमध्ये त्यांच्याकडून अशाच कामगिरीची अपेक्षा असणार आहे.