सुशीलकुमार भारताचा फ्लॅग बेअरर

लंडन ऑलिम्पिकमध्ये अव्वल कुस्तीपटू सुशील कुमारला भारताचा फ्लॅग बेअरर बनण्याचा मान मिळाला आहे. सुशीलनं २००८ च्या बीजिंग ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी ब्राँझ मेडलची कमाई केली होती. आणि त्यामुळेच त्याला भारतीय टीमचा फ्लॅग बेअरर होण्याचा मान मिळाला आहे. गेल्या काही दिवसांपासून अनेक नावांची चर्चा झाली होती. आणि अखेर सुशील कुमारच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे.

Updated: Jul 17, 2012, 01:10 PM IST

www.24taas.com, नवी दिल्ली

 

लंडन ऑलिम्पिकमध्ये अव्वल कुस्तीपटू सुशील कुमारला भारताचा फ्लॅग बेअरर बनण्याचा मान मिळाला आहे. सुशीलनं २००८ च्या बीजिंग ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी ब्राँझ मेडलची कमाई केली होती. आणि त्यामुळेच त्याला भारतीय टीमचा फ्लॅग बेअरर होण्याचा मान मिळाला आहे. गेल्या काही दिवसांपासून अनेक नावांची चर्चा झाली होती. आणि अखेर सुशील कुमारच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे.

 

बीजिंग ऑलिम्पिकमध्ये ब्राँझ मेडल पटकावणा-या सुशील कुमारकडून लंडन ऑलिम्पिकमध्येही मोठ्या आशा आहेत. या वर्ल्ड चॅम्पियन रेसलरनं रेसलिंगच्या दुनियेत भारतासाठी नेहमीच अभिमानास्पद कामगिरी केली आहे. आता लंडन ऑलिम्पिकमध्ये पुन्हा एकदा मेडल पटकावून देण्यासाठी तो प्रयत्नशील असणार आहे.

 

२००८  बीजिंग ऑलिम्पिकमध्ये रिपेचार्ज राऊंडमध्ये कझाकस्तानच्या लिओनिड स्प्रिंडोनोव्हला पराभूत करत सुशील कुमारनं ब्राँझ मेडलवर कमाई केली होती. भारताच्या या अव्वल रेसलरनं बीजिंगमध्ये भारताची मान अभिमानानं उंचावली होती. १५५२ च्या हेलसिन्की ऑलिम्पिकमध्ये खाशाबा जाधव यांनी रेसलिंगमध्ये भारताला पहिलं-वहिलं मेडल पटकावून दिलं होतं. त्यानंतर सुशीलनं ही किमया साधली होती. मॅटवरील रेसलिंगमध्ये त्यानं प्रतिस्पर्धी रेसलर्सना धुळ चारली होती. आता लंडन ऑलिम्पिकमध्ये पुन्हा एकदा त्याच्याकडे मेडलचा प्रमुख दावेदार म्हणून पाहिलं जातंय. नजीकच्या काळात त्याची कामगिरीही समाधानकारक झाली आहे. त्यामुळेच त्याच्याकडून चाहत्यांनी आशा बाळगणही सहाजिकच आहे.

 

२००८ बीजिंग ऑलिम्पिकमध्ये सुशील कुमारनं ब्राँझ मेडल पटकावत सा-यांचच लक्ष आपल्याकडे वेधून घेतलं. तर २०१०  मॉस्कोमध्ये झालेल्या वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये २०१०  मध्ये दिल्लीमध्ये झालेल्या कॉमनवेल्थ चॅम्पियनशिपमध्येही त्यानं गोल्ड मेडलची कमाई केली होती. आणि एशियन चॅम्पियनशिपमध्येही त्याच्या नावावर एक गोल्ड मेडल, एक सिल्व्हर मेडल आणि दोन ब्राँझ मेडल्स आहेत.

 

आपल्या भावाकडून रेसलिंगची प्रेरणा घेतलेल्या सुशील कुमारनं त्याला जेव्हा-जेव्हा संधी मिळाली त्या-त्या वेळी स्वत:ला सिद्ध करुन दाखवलं आहे. आणि आता ऑलिम्पिकमध्ये त्याला पुन्हा एकदा सा-यांच लक्ष वेधून घेण्याची संधी आहे. आता मिळालेल्या संधीचं तो सोनं करतो का ? याकडेच सा-या क्रीडाप्रेमींच लक्ष आहे.

 

सुशील कुमारची कामगिरी

२००८  बीजिंग ऑलिम्पिक - ब्राँझ मेडल,  २०१० मॉस्को वर्ल्ड चॅम्पियनशिप - गोल्ड मेडल,  कॉमनवेल्थ चॅम्पियनशिप- चार गोल्ड मेडल्स, २०१०  दिल्ली कॉमनवेल्थ गेम्स -

गोल्ड मेडल, एशियन चॅम्पियनशिप - एक गोल्ड, एक सिल्व्हर, दोन ब्राँझ