भारताला पहिलं पदक, गगनने पटकावलं ब्राँन्झ

भारताचाच नेमबाज गगन नारंग याने लंडन ऑलिम्पिकमध्ये भारताला पहिलंवहिलं पदक मिळवून दिलं आहे. १० मी. पुरूष एअर रायफल शूटींग स्पर्धेत गगन नारंगने तिसरे स्थान पटकावित कास्य पदकाला गवसणी घातली आहे.

Updated: Jul 30, 2012, 05:37 PM IST

www.24taas.com, लंडन

 

भारताचाच नेमबाज गगन नारंग याने लंडन ऑलिम्पिकमध्ये भारताला पहिलंवहिलं पदक मिळवून दिलं आहे. १० मी. पुरूष एअर रायफल शूटींग स्पर्धेत गगन नारंगने तिसरे स्थान पटकावित कास्य पदकाला गवसणी घातली आहे.  गगनने ७०१.१ इतके गुण कमावत कास्य पदक अक्षरश: खेचून आणलं. भारताचं हे पहिलं वहिलं पदक असल्याने देशभरात जल्लोष केला जात आहे.

 

त्याने पात्रता फेरीत यश मिळवून अंतिम फेरीत आपले स्थान पक्के केले होते. पात्रता फेरीमध्ये नारंग आणि बिंद्रा यांच्यात जोरदार टक्कर झाली. अंतिम फेरीत नारंगने अत्यंत चुरशीची लढत दिली.  गगन कशी कामगिरी करतो, याकडे सगळ्यांचे लक्ष होते.

 

शूटिंग बरोबरच इतर काही क्रीडाप्रकारांकडे भारतीयांचे लक्ष आज राहणार आहे. हॉकीत भारताचा मुकाबला नेदरलॅंडबरोबर रात्री साडेआठ वाजता होणार आहे. रात्री साडेदहा वाजता साईना नेहवालची मॅच आहे. बॉक्सिंगमध्ये संध्याकाळी साडेसात वाजता सुमित सांगवान ८१ किलो गटात आपली ताकद आजमावणार आहे.

 

[jwplayer mediaid="147923"]