नाशिकमध्ये इच्छुकांचा प्रचार सुरू

नाशिकमध्ये अजून कुठल्याच पक्षाची उमेदवार यादी जाहीर झालेली नाही. तरीही विविध पक्षातल्या इच्छुकांनी तिकीट गृहीत धरुन प्रचार सुरू केला आहे. तर अनेकांनी तिकीट न मिळाल्यास स्वबळावर लढण्याची तयारी ठेवली आहे.

Updated: Jan 28, 2012, 11:07 PM IST

मुकुल कुलकर्णी, www.24taas.com, नाशिक

नाशिकमध्ये अजून कुठल्याच पक्षाची उमेदवार यादी जाहीर झालेली नाही. तरीही विविध पक्षातल्या इच्छुकांनी तिकीट गृहीत धरुन प्रचार सुरू केला आहे. तर अनेकांनी तिकीट न मिळाल्यास स्वबळावर लढण्याची तयारी ठेवली आहे.

नाशिक महापालिकेच्या प्रभाग क्रमांक २४ मधून इच्छुक असलेले  धनंजय बेळे यांनी धडाक्यात प्रचार सुरू केला आहे. मात्र ते कोणत्या पक्षाकडून लढणार हे अजून त्यांनाही माहिती नाही. सगळ्या पक्षांकडं ते चाचपणी करत आहेत. ज्या पक्षाकडून तिकीट मिळेल त्या पक्षाकडून लढणार असल्याचं ते सांगतात.

शिवसेनेचे विनायक पांडे यांनी तर पत्रकबाजीतून प्रचार सुरू केला आहे. मनसेची यादीही अजून जाहीर व्हायची आहे. तरीही मनसेच्या इच्छुकांनी तिकीट गृहीत धरुन प्रचार सुरू केला आहे.

जागावाटपाचा वाद, संभाव्य बंडखोरी टाळण्यासाठी राजकीय पक्ष उमेदावारी जाहीर करताना उशीर करत आहेत. त्यामुळं इच्छुकांमध्ये अस्वस्थता आहे. पक्षाकडून मिळाली तर ठीकच, नाहीतर स्वबळावर लढण्याच्या इराद्यानेच इच्छुक प्रचारात उतरले आहेत.