एचटीसीचा सर्वात स्वस्त डिझायर २१० लॉन्च

By Prashant Jadhav | Last Updated: Tuesday, April 22, 2014 - 20:37

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
आजकाल बाजारात अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टिम असलेल्या स्मार्ट मोबाईल फोनची क्रेज वाढत आहे. दररोज एक नवीन कंपनी बाजारात नवीन अँड्रॉइड फोन आणत आहेत. एचटीसीने जगभरातील सर्वात स्वस्त स्मार्टफोन डिझायर २१० लॉन्च केला आहे.
या फोनची किंमत ८७०० रूपये किंमत ठरविण्यात आली आहे. येत्या दोन वर्षात भारतात कंपनीला आपली भागीदारी दुप्पट करण्याचे लक्ष्य असल्याचे अध्यक्ष शियालिन चांग यांनी ही माहिती दिली.
येत्या वर्षभरात भारतीय बाजारात १० हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीचे स्वस्त फोन आणण्याचा विचार आम्ही करत आहोत. असे करण्यात आम्ही यशस्वी झाले तर जगभरात लागू करणार आहे. बाजारात आमची भागीदारी सुमारे ६-७ टक्के आहे.
एचटीसी डिझायर २१० अँड्रॉइड जेली बीनवर आधारित ड्युअल सीम आहे. यात ५ मेगा पिक्सल कॅमेरा आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Tuesday, April 22, 2014 - 20:37
comments powered by Disqus