सायबर क्राइममुळे भारताचं ८ अब्ज डॉलर्सचं नुकसान

भारतात गेल्या वर्षभरात ४.२ कोटींहून अधिक लोक सायबर गुन्ह्यांचे बळी ठरले आहेत. ज्यामुळे एकून ८ अब्ज डॉलर्सचं नुकसान झालं आहे. अँटी-व्हायरस निर्माण करणाऱ्या नॉर्टन कंपनीच्या रिपोर्टमध्ये या संदर्भात खुलासा करण्यात आला आहे.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Sep 12, 2012, 05:32 PM IST

www.24taas.com, न्यू यॉर्क
भारतात गेल्या वर्षभरात ४.२ कोटींहून अधिक लोक सायबर गुन्ह्यांचे बळी ठरले आहेत. ज्यामुळे एकून ८ अब्ज डॉलर्सचं नुकसान झालं आहे. अँटी-व्हायरस निर्माण करणाऱ्या नॉर्टन कंपनीच्या रिपोर्टमध्ये या संदर्भात खुलासा करण्यात आला आहे.
नॉर्टन सायबरक्राइम रिपोर्ट २०१२ मध्ये २४ देशांमधील १३,०००हून अधिक प्रौढांच्या अनुभवावरून हा रिपोर्ट तयार करण्यात आला आहे. यात भारतातील १००० लोक होते. गेल्या १२ महिन्यांत जगभरातील सायबर गुन्हेगारांमुळे ११० अब्ज डॉलर्सचं नुकसान झालं आहे.
रिपोर्टमधील भारतीय सायबर गुन्ह्यांच्या माहितीनुसार १२ महिन्यांत ४.२ कोटी लोक सायबर क्राइमचे शिकार ठरकले आहेत. त्यामुळे ८ अब्ज डॉलर्सचं नुकसान झालंय. रिपोर्टमध्ये ६६ टक्के भारतीय म्हणाले आहेत, की आमच्या आयुष्यात आम्ही कमीत कमी एकदा तरी सायबर गुन्ह्यांचे शिकार बनलो आहोत. तर ५६ टक्के भारतीयांनी कबूल केलं की गेल्या वर्षभरातच ते सायबर गुन्ह्यांना बळी पडले.