झोलोचा Q१०१०i हा नवा स्मार्टफोन लॉन्च

सध्या स्मार्टफोनच्या मार्केटमध्ये झोलो या कंपनीच्या स्मार्टफोननी ग्राहकांची चांगलीच पसंती मिळवलीय. याच स्मार्टफोनच्या सीरिजमध्ये झोलोनं ग्राहकांसाठी आणखी एक फोन लॉन्च केलाय. Q१०१० चा नेक्स्ट वर्जन Q१०१०i झोलोनं लॉन्च केलाय.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: Apr 7, 2014, 08:52 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, रत्नागिरी
सध्या स्मार्टफोनच्या मार्केटमध्ये झोलो या कंपनीच्या स्मार्टफोननी ग्राहकांची चांगलीच पसंती मिळवलीय. याच स्मार्टफोनच्या सीरिजमध्ये झोलोनं ग्राहकांसाठी आणखी एक फोन लॉन्च केलाय. Q१०१० चा नेक्स्ट वर्जन Q१०१०i झोलोनं लॉन्च केलाय.
झोलोनं आपल्या वेबसाइटवर याची घोषणा केली आहे. Q१०१०i या स्मार्ट फोनची किंमत १३,४९९ रुपये आहे. मात्र हा स्मार्टफोन बाजारात केव्हा उपलब्ध होईल याबाबत कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही.
झोलो Q१०१०i स्मार्टफोनची फिचर्स
डिस्प्ले
> ५ इंच एचडी आयपीएस डिस्प्ले
> रिझ्युलेशन ७२०x१२८० पिक्सल
> यामध्ये OGS (वन ग्लास सॉल्यूशन), स्क्रॅच रजिस्टंट ग्लास
स्टोरेज
> १.३ GHz क्वॉड-कोर मीडियाटेक MT6582 प्रोसेसर
> ४०० जीपीयू आणि १ जीबी रॅम
> इनबिल्ट स्टोरेज ८ जीबी, मायक्रोएसडी कार्डने ३२ जीबी
कॅमेरा
> ८ मेगापिक्सल ऑटोफोकस रिअर कॅमेरा, एक्सनॉर आर सेंसर
> २ मेगापिक्सल फ्रंट फेसिंग कॅमेरा
ऑपरेटींग सिस्टम
> ड्यूल सिम डिव्हाइस
> अँड्राईड ४.२ जेली बीन ऑपरेटींग सिस्टम, ४.४ किटकॅट वर देखील अपग्रेड करता येणार
कनेक्टिविटी
> G, वाय-फाय, मायक्रो-यूएसबी आणि ब्ल्यूटूथ
> २ जी नेटवर्क
बॅटरी
> बॅटरी क्षमता २५००mAh
> १९ तास टॉक टाइम, ७३२ तास स्टँडबाय टाइम
> १४३.६x७२.२x८.३mm डायमेंशन असणारा हा फोन काळ्या रंगात उपलब्ध