नवी पिढी, नवी नाती-३ 
पती पत्नीच्या नात्याचं स्वरुप आणि या नात्याकडं पाहण्याचा आजच्या पिढीचा दृष्टीकोन दिवसेंदिवस बदलत चालल्याचं देशातल्या आकडेवारीवरून स्पष्ट होतंय. लग्न या संकल्पनेविषयी आजच्या पिढीला काय वाटतं? घटस्फोटांचं प्रमाण का वाढत चाललंय? आणि घटस्फोटांनंतर पती-पत्नीमध्ये निखळ मैत्रीचं नातं राहू शकतं का?