Good news : महिला कर्मचाऱ्यांसाठी, प्रसूती रजा आता सहा महिन्यांची

महिला कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज.  प्रसूती रजेचा कालावधी वाढवणारे विधेयक राज्यसभेत मंजूर करण्यात आले आहे. त्यामुळे महिलांना भरपगारी आता ६ महिन्यांची रजा मिळणाचा मार्ग मोकळा झाला आहे.

PTI | Updated: Aug 11, 2016, 05:50 PM IST
Good news : महिला कर्मचाऱ्यांसाठी, प्रसूती रजा आता सहा महिन्यांची title=

नवी दिल्ली : महिला कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज.  प्रसूती रजेचा कालावधी वाढवणारे विधेयक राज्यसभेत मंजूर करण्यात आले आहे. त्यामुळे महिलांना भरपगारी आता ६ महिन्यांची रजा मिळणाचा मार्ग मोकळा झाला आहे.

सरकारी आणि खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांना आता २६ आठवड्यांपर्यंतची पगारी रजा मिळणार आहे. यासंबधीचे विधेयक गुरुवारी राज्यसभेत मंजूर करण्यात आले आहे. याआधी प्रसूती रजेचा कालावधी हा केवळ १२ आठवड्यांचा होता. तो आता २६ आठवड्यांचा करण्यात आलाय.

या नव्या विधेयकामुळे सरकारी आणि खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांना दिलासा मिळणार आहे. सरकारी नोकरीत काम करणाऱ्या महिलांना ही सुविधा याआधी होतीच. परंतु, आता खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांनादेखील याचा फायदा होणार आहे.

या विधेयकामध्ये सरोगसी मातांचा उल्लेख करण्यात आलेला नाही. जर एखादी महिला कर्मचारी बाळास दत्तक घेत असेल, तर तिला १६ आठवड्यांची पगारी रजा दिली जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी झालेल्या कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या बैठकीत या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली होती. आज हे बिल पास झाले.