www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
हल्ली सरकारी नोकरी मिळवणं फार कठीण होऊन बसलंय. जागा कमी मात्र त्यासाठी अर्ज भरपूर अशी अवस्था दिसून येते. तसंच सरकारी योजनांचा लाभ आमच्यापर्यंत पोहोचतच नाही अशी लोकांची तक्रारही असते. त्यातच सरकारी बँका कमी त्यामुळे प्रत्यक्ष लोकांपर्यत सरकार पोहोचतच नाहीय. मात्र, सरकार आता एक नवीन पाऊल उचलतंय. ज्यात एकाच दगडात दोन पक्षी मारले जाणार आहेत म्हणजेच बेरोजगारांना नोकऱ्या आणि सरकारी योजनांचा लाभ जास्तीत जास्त लोकांना मिळेल.
आता सरकारी बँका मिळवून देणार आहे ५० हजार बेरोजगारांना नोकरी. चालू वर्ष २०१३-१४ च्या दरम्यान संपूर्ण देशात साधारण ८ हजार शाखा उघडण्यात येणार आहेत. त्यामुळे साधारण ५० हजार जणांना या संधीचा फायदा उचलता येणार आहे.
विविध सरकारी योजनांचा लाभ लोकांपर्यंत पोहोचावा आणि जी रक्कम त्यांना या योजनेतून मिळते ती रक्कम जास्तीत जास्त लोकांपर्यत थेट पोहोचावी म्हणून या शाखा उघडण्यात येतील. आठ हजार शाखा सरकारने चालू केल्या तर साधारण ५० हजार जणांना रोजगार मिळू शकतो. या योजनेअंतर्गत ग्रामीण बँकाही २००० हजार शाखा नव्यानं सुरु करणार आहेत.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.