१० वी, १२ वीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च २०१७ मध्ये होणा-या दहावी-बारावीच्या बोर्डाच्या परीक्षांचे वेळापत्रक वेबसाइटवर जाहीर करण्यात आले आहे. 

Updated: Oct 29, 2016, 01:49 PM IST
१० वी, १२ वीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर title=

मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च २०१७ मध्ये होणा-या दहावी-बारावीच्या बोर्डाच्या परीक्षांचे वेळापत्रक वेबसाइटवर जाहीर करण्यात आले आहे. 

बारावीची लेखी परीक्षा २८ फेब्रुवारी ते २५ मार्च २०१७ दरम्यान होणार आहे. दहावीची परीक्षा ७ मार्च ते २९ मार्च २०१७ दरम्यान होणार आहे.

'विद्यार्थ्यांच्या मनावरील ताण कमी होण्याच्या दृष्टीने आणि शाळा, विद्यार्थांना अभ्यासाचे नियोजन करण्याच्या हेतून वेळापत्रक तयार करण्यात आले आहे.

विद्यार्थ्यांना परीक्षेचे सविस्तर वेळापत्रhttps://mahahsscboard.maharashtra.gov.in/ या वेबसाइटवर उपलब्ध आहे. मात्र हे वेळापत्रक केवळ माहितीसाठी आहे. लेखी परीक्षेपूवीर् शाळा-ज्युनिअर कॉलेजकडे देण्यात येणारे छापील वेळापत्रक अंतिम असेल. त्या वेळापत्रकानुसार खात्री करूनच विद्यार्थ्यांनी परीक्षेला जावे असे आवाहन बोर्डातर्फे पाठविण्यात आलेल्या प्रसिद्धीपत्रकात करण्यात आले आहे.