१६ वर्षाच्या मुलाने बनवलं गुगलपेक्षाही सर्वोत्कृष्ट सर्च इंजीन

अनमोल टुक्रेलने गुगलपेक्षा ही ४७ टक्के तंतोतंत सर्च करणार इंजीन तयार केलं आहे. मूळचा भारतीय पण सध्या कॅनडीयन असलेला अनमोल हा १६ वर्षांचा आहे, या वयातच त्याने ही कमाल करून दाखवली आहे. 

Updated: Aug 21, 2015, 11:48 PM IST
१६ वर्षाच्या मुलाने बनवलं गुगलपेक्षाही सर्वोत्कृष्ट सर्च इंजीन title=

मुंबई : अनमोल टुक्रेलने गुगलपेक्षा ही ४७ टक्के तंतोतंत सर्च करणार इंजीन तयार केलं आहे. मूळचा भारतीय पण सध्या कॅनडीयन असलेला अनमोल हा १६ वर्षांचा आहे, या वयातच त्याने ही कमाल करून दाखवली आहे. 

विशेष म्हणजे गुगलच्या सायन्स फेअरमध्ये अनमोलने ही कमाल करून दाखवली आहे. जागतिक स्तरावर १३ ते १८ वर्षांच्या मुलांसाठी ही स्पर्धा होती, यात अनमोलने ही कमाल केली आहे.

अनमोलने या सर्च इंजीनचं कोडिंग ६० दिवसांत केलं आहे. मला स्वत:ला सर्च स्पेसमध्ये हा प्रोजेक्ट करायचा होता, मात्र गुगलचं याआधीच सर्च इंजीन आहे, मात्र यापुढे आणखी काय करता येऊ शकतं, हे पाहून मी गुगल सर्च इंजीनच्याही पुढे तंतोतंत सर्च करणार इंजीन तयार केलं आहे. अनमोलने नुकतच दहावीपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं आहे.

आपण बनवलेलं सर्च इंजीन हे गुगलपेक्षाही सरस असल्याचा दावा त्याने केला आहे कारण हे सर्च इंजीन अकाऊंटच ठिकाण आणि हिस्ट्रीच देत नाही तर कन्टेट आणि त्याचा अर्थही समजावण्याचा प्रयत्न करतं. अनमोल या भारतात दोन वर्षाच्या इंटर्नशीप प्रोग्रामसाठी होता. बंगळुरूच्या अॅडॅक फर्म आयस्क्रीम लॅब्समध्ये तो इंटर्नशीप करत होता.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.